गेल्या काही दिवसांपूर्वीच भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे तिथे बरेच नुकसान झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने नेपाळला आपले शेजारी कर्तव्याचे पालन करत मदत करण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने बिगर बासमती पांढर्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, परंतु आता सरकारने भारतातील स्वदेशी कंपनी पतंजलीला या निर्यात बंदीतून एकदाच सूट दिली आहे. सरकारने पतंजली आयुर्वेदला नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी दान म्हणून २० मेट्रिक टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्याची परवानगी दिली आहे.
जुलैपासून सरकारने निर्बंध लादले आहेत
देशांतर्गत तांदूळ पुरवठ्यात कोणतीही कमतरता भासू नये म्हणून भारत सरकारने २० जुलैपासून बिगर बासमती पांढर्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. काही देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विनंतीनुसार, सरकारने दिलेल्या परवानगीनुसार निर्यात करण्याची परवानगी आहे.DGFT ने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेद लिमिटेडला नेपाळला भूकंपग्रस्तांसाठी २० मेट्रिक टन नॉन बासमती पांढरा तांदूळ दान करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचाः महारेराची समुपदेशन व्यवस्था घर खरेदीदार अन् विकासकांसाठी ठरतेय लाभदायक
याआधी भारताने इतर सात देशांनाही पुरवठा केला होता
गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये जारी केलेल्या DGFT अधिसूचनेनुसार, सरकारने नेपाळ, कॅमेरून आणि मलेशियासह सात देशांमध्ये १०,३४,८०० टन गैर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली होती. गेल्या महिन्यात भारत सरकारने नेपाळ, कॅमेरून (१,९०,००० टन), कोटे डी’आयवर (१,४२,००० टन), गिनी (१,४२,००० टन), मलेशिया (१,७०,००० टन), फिलिपिन्स (२, ९५,००० टन) आणि सेशेल्स (८०० टन) तांदूळ निर्यात करण्यास मंजुरी दिली होती.
हेही वाचाः Money Mantra : मोदी सरकारने पीपीएफसह ‘या’ योजनांचे नियम बदलले, मोठा दिलासा मिळाला
नेपाळमध्ये ६ नोव्हेंबरला भूकंप झाला
नेपाळमध्ये ६ नोव्हेंबर रोजी ६.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात १५२ लोकांचा मृत्यू झाला होता आणि २५० हून अधिक लोक जखमी झाले होते. भूकंप होताच नेपाळला मदत सामग्री पुरविणारा भारत हा पहिला देश होता.