नवी दिल्ली : तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा (फिनटेक) क्षेत्रातील आघाडीची कंपनी पेटीएम सध्या अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांची बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील आठवड्यात घेणार असून, मुख्यत: या कंपन्यांनी नियमांचे कठोर पालन करण्याची सूचना अर्थमंत्र्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘कर्ज-जीडीपी गुणोत्तरा’त ७३.४ टक्क्यांपर्यंत घसरण शक्य; नाणेनिधीच्या इशाऱ्याला धुडकावून लावणारा रिझर्व्ह बँकेच्या पत्रिकेत दावा

वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडची उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. ‘केवायसी’ नियमांचे पालन न करण्यात हयगय केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर निर्बंध लादले आहेत. पेटीएम ही देशातील डिजिटल देयक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रदूत म्हणून ओळखली जाणारी कंपनी आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या आठवड्यात या क्षेत्रातील सर्वच मुख्य कंपन्यांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. बैठकीत या कंपन्यांच्या समस्यांवर चर्चा होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली.

या बैठकीला रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी, अर्थमंत्रालय, उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीआयपीपी) यासह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. कंपन्यांना नियमांचे पालन करावे, यावर सीतारामन या बैठकीत भर देण्याची शक्यता आहे. कारण या कंपन्यांकडे असलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा असतो. त्यामुळे या कंपन्यांनी नियामकांच्या सूचनांचे पालन करण्याबाबतही सीतारामन भूमिका मांडतील, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> विभोर स्टील ट्यूबचे दमदार पदार्पण; गुंतवणूकदारांना १९३ टक्क्यांच्या बहुप्रसवा परतावा

पेटीएम समभागात वाढती खरेदी रिझर्व्ह बँकेच्या ३१ जानेवारीच्या कारवाईनंतर सुरू झालेल्या पेटीएम (वन ९७ कम्युनिकेशन्स) समभागांतील घसरण कळा, मागील सलग तीन सत्रात थांबली इतकेच नाही तर उलटफेर होत समभागाने ५ टक्के अशा वरच्या सर्किट मर्यादेपर्यंत वाढ साधली आहे. मंगळवारच्या सत्रात समभागांत ५ टक्के वाढ झाली आणि तो ३७६ रुपयांवर बंद झाला. सलग तीन सत्रात मिळून तो १६ टक्क्यांनी वधारला. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार कंपनीचे २३,८९७ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paytm fiasco fm nirmala sitharaman meeting with the head of fintech firms in next week print eco news zws