वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अन्नपदार्थाच्या घरपोच बटवड्याच्या क्षेत्रातील झोमॅटोने पेटीएम कंपनीच्या चित्रपट तिकीट व कार्यक्रम व्यवसाय विकत घेण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. पेटीएमची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्ससोबत झोमॅटोची या सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या या व्यवहारावर चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला उभय कंपन्यांनीही दुजोरा दिला आहे.

झोमॅटोने याबाबत भांडवली बाजाराला नियमानुसार प्रगटन या स्वरूपात दिलेल्या माहितीत, पेटीएमसोबत सध्या या व्यवहारावर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि या संबंधाने अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संचालक मंडळ आणि इतर आवश्यक मंजुरीचे सोपस्कारही पूर्ण करावेत, अशा टप्प्यावर हा व्यवहार अद्याप पोहोचलेला नाही. कंपनी तोट्यातील व्यवसायांमध्ये सुधारणा करीत आहे. झोमॅटोने सध्या चार मुख्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे म्हटले आहे.  

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What Aaditya Thackeray Said?
आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य, “भाजपा, मिंधे गँग आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अनेकजण..”
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Credit increase possible at 15 percent rate print eco news
यंदा १५ टक्के दराने पतपुरवठा वाढ शक्य; स्टेट बँक अध्यक्ष खारा यांचा आशावाद
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”

हेही वाचा >>>सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई आशियातून २१ व्या स्थानावर, पुण्यासह अन्य शहरं कितव्या स्थानी?

झोमॅटोने २०२१ मध्ये ब्लिंकिट ही कंपनी ताब्यात घेतली होती. हा व्यवहार ४,४४७ कोटी रुपयांच्या मोबदल्यात झाला होता. आता कंपनी पेटीएमचा चित्रपट तिकीट आणि कार्यक्रम व्यवसाय विकत घेण्याच्या तयारीत आहे. पेटीएमला नवीन भागीदारी करण्यास नियामकांनी मंजुरी दिलेली आहे. पेटीएमच्या चित्रपट तिकीट व कार्यक्रम व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक विक्री मार्चअखेर संपलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षात १,७४० कोटी रुपये होती.