मुंबई: तयार खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हल्दीराम स्नॅक्स फूड प्रा. लिमिटेडमधील हिस्सा खरेदीसाठी बहुराष्ट्रीय कंपनी पेप्सिकोने उत्सुकता दर्शवली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पेप्सिकोने या संदर्भात हल्दीरामचे मालक असलेल्या अग्रवाल कुटुंबाशी चर्चा सुरू केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हल्दीराममधील हिस्साखरेदीसाठी याआधी टेमासेक आणि अल्फा वेव्ह ग्लोबल या जागतिक गुंतवणूक कंपन्यांनी देखील रस दाखवला आहे. ब्लॅकरॉक आणि ब्लॅकस्टोन या महाकाय अमेरिकी गुंतवणूकदार संस्थांचा देखील या अंगाने प्रयत्न सुरू आहे.
न्यूयॉर्क येथे मुख्यालय असलेल्या पेप्सिकोने अग्रवाल कुटुंबाशी थेट चर्चा सुरू केली असून ती प्राथमिक टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. हल्दीरामचे मूल्यांकन ८५,००० कोटी ते ९०,००० कोटी रुपयांच्या घरात राहण्याचे अनुमान आहे. टेमासेक आणि अल्फा वेव्ह ग्लोबलने आधीच हल्दीराममधील १० ते १५ टक्के हिस्सेदारीसाठी उत्सुकता दर्शवली आहे. गेल्या महिन्यात यासंबंधित बोलणी सुरू झाली असून वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. टेमासेककडून कंपनीमध्ये १०० कोटी डॉलरहून अधिक गुंतवणुकीची शक्यता आहे.
हेही वाचा >>> ‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
हल्दीराम ही भारतीय बाजारपेठेतील तयार खाद्यपदार्थांची विक्री करणारी आघाडीची कंपनी आहे. नमकीन, मिठाई, आणि प्री-मिक्स्ड अन्नपदार्थांसह या नाममुद्रेखाली ५०० हून अधिक प्रकारची उत्पादने विक्री केली जातात. कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १२,८०० कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे, जो पेप्सिकोच्या भारतातील तयार खाद्यान्न व्यवसायाच्या दुप्पट आहे. पेप्सिकोच्या या व्यवसायाने भारतात एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कालावधीत ४,७६३.२९ कोटी रुपये कमाई केली होती.
हेही वाचा >>> हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
लेज, कुरकुरे आणि डोरिटोस सारख्या नाममुद्रेसह पाश्चात्य स्नॅक्स बाजारपेठेत वर्चस्व गाजवणाऱ्या पेप्सिकोसाठी हे पाऊल, भारतात वेगाने वाढणाऱ्या स्नॅक्स विभागात स्थान बळकटीस मदतकारक ठरेल. पेप्सिकोचा पाश्चात्य स्नॅक्समध्ये २४ टक्के बाजार हिस्सा आहे परंतु नमकीन आणि भुजिया सारख्या पारंपारिक भारतीय स्नॅक्समध्ये तिची मर्यादित उपस्थिती आहे.
भारतीय बाजार फायदेशीर वर्ष २०२३ मध्ये भारतीय स्नॅक्स बाजारपेठ ४२,६९४.९ कोटी रुपयांची होता. २०३२ पर्यंत ती ९५,५२१.८ कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे. मात्र ही बाजारपेठ अजूनही विखुरलेल्या स्वरूपात आहे. देशात बालाजी, बिकानेरवाला आणि बिकाजी फूड्ससारखे अनेक प्रादेशिक नाममुद्रा हल्दीरामसोबत स्पर्धा करत आहेत. या प्रादेशिक नाममुद्रा अनेकदा कमी किमती, थेट वितरण आणि किरकोळ विक्रेत्यांना अधिक लाभ देत असल्याने पेप्सिकोसारख्या मोठ्या कंपनीला ते आव्हान देतात.