मुंबई : माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील मध्यम-श्रेणीतील कंपनी पर्सिस्टंट सिस्टीम्सने यंदा नवीन नोकरभरतीत आणि त्यासाठी शिक्षणसंस्थाच्या ‘कॅम्पस’ला भेट देण्यावर भर तुलनेने कमी राहिल, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले.पुण्यात मुख्यालय असलेल्या या कंपनीने डिसेंबर तिमाहीची मिळकत कामगिरी जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी, तिचे मुख्य वित्तीय अधिकारी सुनील सप्रे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वरील माहिती दिली. सप्रे म्हणाले की, जवळपास १८ महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू आहे आणि अद्याप विशिष्ट प्रकल्पांवर नियुक्त केले गेलेले नाहीत अशा नव्याने भरती झालेल्या उमेदवारांचे प्रमाण आधीच खूप जास्त आहे. परिणामी नवीन नोकरभरतीबाबत हळूवारपणे पावले टाकली जात आहेत. पुढील तीन वर्षांमध्ये, कंपनीने तिच्या परिचालन नफ्याचे मार्जिन सध्याच्या १४.५ – १५ टक्क्यांच्या पातळीच्या तुलनेत जवळपास ३ टक्के अधिक राखण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे सप्रे यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा