पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा राजकारण्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारा आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असून, पेट्रोल प्रति लिटर १०० रुपये आणि डिझेल प्रति लिटर ९० रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे. परंतु आता लवकरच त्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतात, असे मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी सांगितले. एवढेच नाही तर तेल कंपन्यांची कामगिरी कशी असते, यावरही ते अवलंबून असेल. जर या कंपन्यांनी पुढील तिमाहीत चांगली कामगिरी केली तर ते किमतीतील कपातीवर निर्णय घेऊ शकतील. पुरी यांनी शनिवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकारांशी चर्चा केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हरदीप सिंग पुरी यांच्या या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर आदींबाबत प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. अशा स्थितीत पुरी यांच्या विधान महत्त्वाचं मानलं जात असून, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचाः PPF Vs SSY : १.५० लाख गुंतवून मिळवता येणार ६९ लाख रुपये, जाणून घ्या तुम्हाला अधिक परतावा कुठे मिळेल?

आता काही निश्चित सांगू शकत नाही

तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत कोणतीही घोषणा करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. पुढे काय होते आणि काय करता येईल हे पाहावे लागेल, असंही त्यांनी सांगितले. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. पेट्रोलियम कंपन्यांच्या शेवटच्या तिमाहीतील निकालांबाबत पुरी म्हणाले की, ते ‘ठीक’ आहेत. उलट कंपन्यांनी त्यांचे काही नुकसानही भरून काढले. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बाजारावर अवलंबून असतात, परंतु मोदी सरकारने एप्रिल २०२२ पासून त्यांच्या किमती वाढू दिलेल्या नाहीत. सर्वसामान्यांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असंही हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: PPF Vs SSY : १.५० लाख गुंतवून मिळवता येणार ६९ लाख रुपये, जाणून घ्या तुम्हाला अधिक परतावा कुठे मिळेल?

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel likely to become cheaper the petroleum minister gave the indication vrd
Show comments