EPF Withdrawal Rules 2024 : भारतात नोकरी करणाऱ्या सर्व नोकरदार वर्गाचे पीएफ खाते असते. कर्मचारी भविष्य निधी (EPFO)द्वारे चालवली जाणारी ही सेवा एक प्रकारे भविष्यासाठी बचत योजना आहे. दर महिन्याला पगारातील १२ टक्के रक्कम या खात्यात जमा होते, ज्यावर सरकारकडून व्याजही दिले जाते. पीएफ खाते फक्त तुमच्या भविष्यासाठी बचत योजना म्हणूनच वापरले जात नाही, तर तुम्हाला गरज भासल्यास तुम्ही त्यातून कधीही पैसे काढू शकता.

पण, त्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी पाळाव्या लागतात. यात काही महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून रक्कम काढू शकता. चला तर मग तुम्ही तुमच्या PF खात्यातून कोण कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता, जाणून घेऊ…

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
Pan Card For Minor
Pan Card For Minor :१८ वर्ष पूर्ण होण्याआधी काढू शकता पॅन कार्ड, फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस…
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

१) वैद्यकीय उपचार

आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पीएफ खातेधारकाला उपचारासाठी आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज असल्यास ते आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. यासाठी फॉर्म ३१ आणि त्यासोबत C सर्टिफिकेट जमा करावे लागेल, ज्यावर डॉक्टर आणि खातेदाराच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत. उपचारासाठी एकावेळी १,००,००० (एक लाख) रुपयांपर्यंत पैसे काढू शकतो.

२) घर खरेदी

अनेकदा लोकांना घर घेण्यासाठी पैशांची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. यासाठी आवश्यक अट म्हणजे तुमचे पीएफ खाते तीन वर्षे जुने असावे. घर खरेदी करण्यासाठी तुम्ही एकूण रकमेच्या ९० टक्के रक्कम काढू शकता. तुम्ही या सुविधेचा लाभ एकदाच घेऊ शकता.

३) घर नूतनीकरण

घर खरेदी आणि जमीन खरेदी करण्याव्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या फ्लॅट किंवा घराचे नूतनीकरण करत असाल, तर त्यासाठी तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. यासाठी तुमचे पीएफ खाते पाच वर्ष जुने असणे आवश्यक आहे. नूतनीकरणासाठी, तुम्ही तुमच्या मासिक पगाराच्या १२ पट रक्कम काढू शकता. तुम्ही या सुविधेचा फक्त दोनदाच लाभ घेऊ शकता.

४) होम लोन

जर तुम्ही होम लोन घेतले असेल आणि तुम्हाला EMI भरण्यासाठी पैशांची कमतरता भासत असेल तर तुम्ही पीएफ खात्यातून यासाठी पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात किमान तीन वर्षे योगदान देणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही एकूण ९० टक्के पीएफ फंड काढू शकता.

५) लग्न

अनेकदा लोकांकडे लग्नासाठीही पुरेसे पैसे नसतात. अशा परिस्थितीत पीएफ खाते त्यांना मदत करू शकते. कोणताही कर्मचारी खात्यातून विवाहासाठी योगदानाच्या ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम व्याजासह काढू शकतो. यासाठी सात वर्षांची सेवा आवश्यक आहे. स्वतःच्या लग्नाव्यतिरिक्त कर्मचारी भाऊ आणि बहिणीच्या लग्नासाठीही पैसे काढू शकतात.

Story img Loader