सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोदी सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणी आणि महिलांना मोठे गिफ्ट दिला असल्याचा दावा त्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, मोदी सरकार रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना ३००० रुपये देणार असल्याची घोषणा करीत आहे. त्यानंतर लोक त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया विचारत आहेत. आता प्रश्न पडतो की, तुम्हीही अशी पोस्ट पाहिली आहे का? जर पाहिली असेल तर आताच सावध व्हा. खरं तर अधिकृत तथ्य तपासणारी वेबसाइट असलेल्या पीआयबीने या प्रकरणाचा छडा लावला आहे. तसेच पीआयबीच्या तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पंतप्रधान मोदींनी बहिणींना रक्षाबंधनाची भेट दिल्याचा दावा सोशल मीडियावरील पोस्टमधून केला जात आहे. यात महिलांसाठी विशेष योजनेचा दावा संसदेत करण्यात आला असल्याचंही सांगण्यात आलंय. याअंतर्गत सरकार दरमहा महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये टाकणार आहे. लाडली योजनेचेही नाव दाव्यात आहे. परंतु ते सर्व खोटं आहे.

हेही वाचाः इंटेलमध्ये १४० कर्मचाऱ्यांना नारळ, नवी नोकरभरतीही रोखणार; काय आहे कारण?

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये सत्य आले समोर

केंद्रातील मोदी सरकारने संसदेत अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही, असे तपासात निष्पन्न झाले आहे. १५ ऑगस्टला जेव्हा पंतप्रधान मोदींनी दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केलं, तेव्हाही त्यांनी अशी कोणतीही योजना जाहीर केली नव्हती. तसेच आगामी काळात असे कोणतेही नियोजन त्यांनी उघड केलेले नाही. विशेष म्हणजे पीआयबीच्या तथ्य तपासणीत हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झाले आहे. पीआयबीने लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अशा कोणत्याही खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नये.

हेही वाचाः जूनमध्ये भरपूर नोकऱ्या मिळाल्या, EPFO ​​डेटाने दिली दिलासादायक बातमी

मध्य प्रदेश सरकारने सुरू केली योजना

लाडली योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान चालवत आहेत. मध्य प्रदेशातील महिलांच्या खात्यात ३००० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सरकार दरमहा एक हजार रुपये देते. रक्षाबंधन सणाच्या दिवशी ती वाढवून १२५० रुपये करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच या योजनेसाठी नोंदणी सुरू आहे.

Story img Loader