PM Kisan Samman Nidhi : सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. त्यानंतर सर्व लाभार्थी १४ व्या हप्त्या (PM Kisan 14th Installment update) ची प्रतीक्षा करीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा हप्ता मे किंवा जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो. त्यासाठी सरकारनेही पूर्ण तयारी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा २००० रुपयांचे तीन हप्ते मिळतात. एकूणच सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक ६००० रुपये थेट जमा करते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही योजना सुरू केली होती. पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना १ वर्षात ३ हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांची आर्थिक मदत करते. दर ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २,००० रुपये वर्ग केले जातात. आतापर्यंत १३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत.
या शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार का?
ज्या शेतकऱ्यांना अद्याप १३व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील, म्हणजेच त्यांच्या खात्यात ४००० रुपये ट्रान्सफर केले जातील. अनेक शेतकरी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना १३व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. मात्र, आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता २००० ऐवजी ४००० रुपये मिळणार आहेत.
अशा पद्धतीनं चेक करू शकता
शेतकरी आता पीएम किसानच्या वेबसाइटवर १४ व्या हप्त्यासाठी त्यांची स्थिती तपासू शकतात. यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील की नाही ते पाहता येईल. स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या http://pmkisan.gov.in/ वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवरील फार्मर्स कॉर्नरवर जा आणि लाभार्थी स्थितीचा पर्याय निवडा. यावर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन नंबरद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे येतील की नाही हे पाहू शकता.
हेही वाचाः अरविंद केजरीवालांच्या बंगल्याच्या सजावटीसाठी ४५ कोटींचा खर्च, नुसते पडदे आठ लाखांचे, तर मार्बल…
लाभार्थी स्थिती काय आहे?
लाभार्थी स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजना खात्याचा संपूर्ण तपशील असतो. जसे की त्याला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, त्याच्या बँक खात्यात पैसे कधी जमा झाले आहेत, त्याचे कोणतेही हप्ते अडकले आहेत, तर त्याचे कारण काय आहे, त्याचे आधार कार्ड पडताळले आहे की नाही इत्यादी.
हेही वाचाः ‘या’ सरकारी बँकेने व्याजदरात केली वाढ, ५५५ दिवसांच्या एफडीवर मिळतोय मोठा नफा