देशातील निर्मिती क्षेत्राची सक्रियता जून महिन्यात गतिमानतेने सुरू असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये वस्तूंना वाढलेली मागणी याला कारणीभूत ठरल्याचे मासिक सर्वेक्षणाच्या सोमवारी आलेल्या निष्कर्षांतून स्पष्ट झाले. एस ॲण्ड पी ग्लोबल इंडियाने निर्मिती उद्योगातील कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाअंती काढलेला पीएमआय निर्देशांक जून महिन्यात ५७.८ गुणांकावर नोंदवण्यात आला. मे महिन्यात तो ५८.७ गुणांवर होता. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये काही प्रमाणात घसरण झाली आहे. तरीही निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग जूनमध्ये कायम राहिल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः तेजीचा बैल चौखूर…! सेन्सेक्स प्रथमच ६५ हजारांच्या शिखरावर; चार सत्रांत २,३०० अंशांची कमाई

जून महिन्यात निर्मिती क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक सलग दोन वर्षे ५० गुणांकावर नोंदविला गेला आहे. हा गुणांक ५० च्या वर असल्यास विस्तारपूरकता आणि त्याखाली असल्यास आकुंचन दर्शवतो. याआधी डिसेंबर महिन्यात हा पीएमआय निर्देशांक ५७.८ गुणांकावर नोंदविला गेला होता.

हेही वाचाः देशातल्या २ हजारांच्या ७६ टक्के नोटा बँकांमध्ये जमा; ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची संधी

निर्मिती क्षेत्राच्या विस्ताराला मागणीत झालेली वाढ प्रामुख्याने कारणीभूत आहे. यामुळे विक्री, उत्पादन, साठा आणि रोजगार या सर्व पातळ्यांवर सुधारणा झाली आहे. देशातील वस्तू निर्मिती करणाऱ्या उद्योगांच्या नवीन कार्यादेशामध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू आहे. जाहिराती आणि नवी उत्पादने बाजारात येण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे एस अँड पी ग्लोबल इंडियाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmi index at 57 8 in june manufacturing sector continues to be active vrd
Show comments