नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती क्षेत्राचा वेग सरलेल्या मे महिन्यात मंदावल्याचे मासिक सर्वेक्षणातून सोमवारी पुढे आले. निर्मिती क्षेत्रातील सक्रियतेला मापणाऱ्या ‘पीएमआय’ निर्देशांकामध्ये घसरण होऊन, तो मे महिन्यांत तो ५७.५ गुणांवर नोंदला गेला असला तरी तो दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक आहे.

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’द्वारे, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांक मे महिन्यासाठी ५७.५ गुणांवर राहिला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये तो ५८.८ असा नोंदला गेला होता. निर्देशांकाची दीर्घकालीन सरासरी ५३.९ गुणांची आहे. त्यामुळे मे महिन्यात या सरासरीपेक्षा निर्देशांकाची पातळी चार गुणांनी अधिक आहे. निर्देशांक ५० गुणांच्या वर असल्यास विस्तार आणि ५० गुणांच्या खाली असल्यास त्यात घसरण झाल्याचे मानले जाते.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार

हेही वाचा >>> सेन्सेक्ससाठी आजचा विक्रमी दिवस, रेकॉर्डब्रेक उसळीसह बंद होतानाही मोठी झेप; गुंतवणूकदार मालामाल!

निर्देशांकाने तीन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली असली तरी तो मे महिन्यात विस्तारपूरक आहे. कंपन्यांनी नवीन कामाच्या प्रमाणात नोंदविलेली वाढ, चांगली मागणी आणि विपणनाचे यशस्वी प्रयत्न यामुळे वाढ दिसून येत आहे. वाढती उष्णता आणि उत्पादन खर्चातील वाढीमुळे कामाचे तास कमी झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

हेही वाचा >>> ‘मोदी ३.०’ विजयाच्या अंदाजाने अदानी समूहातील समभागांमध्ये तेजीचे वारे; कंपन्यांचे बाजारमूल्य हिंडेनबर्ग-झळ झटकून पूर्वपदावर

देशातील निर्मिती क्षेत्रात साडेनऊ वर्षांहून अधिक काळ सकारात्मकता असून, त्या क्षेत्रातील सक्रियतेला निरंतर गती मिळत आहे. जाहिराती आणि नाविन्यतेसोबत आर्थिक कामगिरीचा अंदाज आणि मागणीबाबतची चांगली स्थिती हे घटक या सकारात्मकतेला पूरक ठरत आहेत. निर्यातीच्या नवीन मागणीमध्ये १३ वर्षांतील सर्वाधिक वाढ झाली आहे. प्रामुख्याने आफ्रिका, आशिया, अमेरिका, युरोप आणि आखाती देशांतून मागणी वाढल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

निर्मिती क्षेत्राचा विस्तार मे महिन्यातही सुरू राहिल्याचे दिसून येत आहे. नवीन कार्यादेश आणि उत्पादनातील वाढ काही प्रमाणात कमी झाल्याने त्याचा वेग काहीसा मंदावला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कमी झालेले कामाचे तास उत्पादनावर परिणाम करणारे ठरले.
– मैत्रेयी दास, अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया

Story img Loader