मुंबई: जवळपास दोन शतकांचा वारसा लाभलेली सराफ पेढी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडच्या (पीएनजी ज्वेलर्स) मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रारंभिक समभाग विक्रीने (आयपीओ) गुंतवणूकदारांच्या दमदार प्रतिसादातून पहिल्या काही तासांतच भरणा पूर्ण केला आणि पहिला दिवस संपला त्यावेळी त्यात दुपटीहून अधिक भरणा झाल्याचे उपलब्ध आकडेवारीने स्पष्ट केले.

शेअर बाजाराकडून उपलब्ध तपशिलानुसार, १,१०० कोटी रुपयांच्या या आयपीओमधून विक्रीला खुल्या झालेल्या सुमारे १.६८ कोटी समभागांसाठी तब्बल दुपटीने म्हणजे ३.३८ कोटी समभागांसाठी बोली लावणारे अर्ज दाखल झाले. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आरक्षित हिश्शात ३.२६ पट अधिक भरणा झाला आणि सामान्य वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव समभागांसाठी २.६१ पट अधिक मागणी नोंदवली गेली. ही समभाग विक्री गुरुवार, १२ सप्टेंबरपर्यंत प्रति समभाग ४५६ रुपये ते ४८० रुपये किमत पट्ट्यासह सुरू राहणार आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
sugarcane mills current status, sugarcane mills,
गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या घटली; जाणून घ्या, यंदाच्या हंगामातील सद्यस्थिती

हेही वाचा >>> एका वर्षात बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडातून ३१ टक्क्यांहून अधिक परतावा

पीएनजी ज्वेलर्स या आधीच म्हणजेच सोमवारी सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांकडून ३३० कोटी रुपये उभे केले आहेत. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात पाऊलखुणा विस्तारताना, विक्री दालनांची संख्या सध्याच्या ३९ वरून, १२० पर्यंत वाढविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले. आयपीओतून उभ्या राहणाऱ्या निधीपैकी ३९३ कोटी रुपयांचा वापर महाराष्ट्रात १२ नवीन दालने सुरू करण्यासाठी कंपनी करणार असून, ३०० कोटींचा वापर कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाणार आहे, असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. ‘पीएनजी’ या नाममुद्रेने कंपनीची सध्या राज्यात ३९ विक्री दालनांची साखळी असून, वेबसाइट्ससह विविध ऑनलाइन बाजारमंचाद्वारे सोने, चांदी, प्लॅटिनम आणि हिरेजडित दागिन्यांसह, विविध किमतीतील आणि रचनेतील मौल्यवान धातू/दागिन्यांच्या उत्पादने विकली जातात.

Story img Loader