पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनीने आज ३० जून २०२३ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीतील उत्पन्न वार्षिक पातळीवर ४२ टक्क्यांनी वाढून ३८,८९४ दशलक्ष रुपयांवर पोहोचले आहे. या कामगिरीविषयी पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इंदर टी. जयसिंघानी म्हणाले, ‘आर्थिक वर्षाची आमची सुरुवात कमालीची चांगली झाली आहे. पहिल्या तिमाहीतील आतापर्यंतचे सर्वोत्तम निकाल आणि नफा आम्ही नोंदवला आहे. सरकार पायाभूत सुविधा आणि संरचनात्मक सुधारणांवर भर देत असून, खासगी भांडवलातील सुधारणा आणि रियल इस्टेट क्षेत्रातील वाढत्या घडामोडींमुळे आमच्या यशाला चालना मिळाली व पर्यायाने निकालांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला. प्रोजेक्ट लीप आणि ग्राहकांना प्राधान्य देण्याचे आमचे धोरण, दर्जेदार उत्पादनांची श्रेणी व दमदार वितरण नेटवर्क यांच्या एकत्रित परिणामांतूनही विकासाला चालना मिळाली. तिमाहीतील विलक्षण निकाल हे आमच्या दमदार व्यावसायिक मॉडेलला मिळालेली पावती आहे,’ असंही त्यांनी सांगितले.
प्रमुख वैशिष्ट्ये काय?
कमॉडिटीच्या किमती कमी असूनही वायर्स आणि केबल व्यवसायात झालेल्या संख्यात्मक वाढीच्या जोरावर आमचे उत्पन्न वार्षिक पातळीवर ४२ टक्क्यांनी वाढून ३८,८९४ दशलक्ष रुपयांवर गेले आहे.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या संख्यात्मक वाढीमुळे वायर्स आणि केबल व्यवसायाचे उत्पन्न वार्षिक पातळीवर ४६ टक्क्यांनी वाढून ३४,८७४ दशलक्ष रुपयांवर गेले आहे. देशांतर्गत वितरणामुळे व्यवसायाचा विकास कायम ठेवणे शक्य झाले, तर आंतरराष्ट्रीय व्यवसायात चांगली वाढ दिसून आली. भौगोलिकदृष्ट्या सांगायचे झाल्यास विस्ताराच्या कक्षा रुंदावल्या आणि सर्वाधिक वाढ उत्तर भागात दिसून आली. केबल व्यवसायात वायर्स व्यवसायाच्या तुलनेत जास्त वाढ दिसून आली. सेगमेंटमधील मार्जिन वार्षिक पातळीवर ३३० बीपीएसने वाढली असून, किमतींची पुनर्रचना, ऑपरेटिंगचे अधिक चांगले लिव्हरेज आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायातील दमदार वाढ या घटकांमुळे वाढ शक्य झाली.
हेही वाचाः Money Mantra : Inactive PAN बाबत मोठी अपडेट, अशा पद्धतीनं होणार सक्रिय, जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय व्यवसायांतील उत्पन्न वार्षिक पातळीवर ८८ टक्क्यांनी वाढले असून एकत्रित उत्पन्नातील त्याचा वाटा ८.९ टक्के आहे. कंपनीने ७२ देशांत आपला जागतिक विस्तार केला आहे.
या तिमाहीदरम्यान एफएमसीजी व्यवसाय थंडावला होता. ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी विक्रीत घट झाली. मात्र, या विभागात वार्षिक आणि अनुक्रमिक पातळीवर ३ टक्के वाढ दिसून आली. चॅनेल रिलाअलाइनमेंटमुळे हे शक्य झाले. पंख्यांच्या व्यवसायात चांगली अनुक्रमिक वाढ दिसून आली. तसेच रिअर इस्टेट क्षेत्रात तेजीसदृश दिवसांमुळे तिमाहीदरम्यान नव्या, बीईई नियमानुसार बनवण्यात आलेल्या पंख्यांची विक्री झाली. स्विचेस व्यवसायातही चांगली वाढ झाली व या विभागातील विक्री खालच्या पातळीवर का होईना, पण गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील ३.८ पटींनी वाढली.दिवे आणि ल्युमिनायर्स व्यवसायात किंचित घट दिसून आली.
एलईडी क्षेत्रात किमतींमध्ये दिसून आलेल्या फरकामुळे ही घट झाली.ईबीआयटीडीए मार्जिन वार्षिक पातळीवर २८० बीपीएसने वाढून १४.१ टक्क्यांवर पोहोचले. किमतींमध्ये झालेली न्याय्य पुनर्रचना, ऑपरेटिंगचे अधिक चांगले लिव्हरेज आणि अनुकूल वैविध्यपूर्ण व्यवसाय यामुळे त्याला चालना मिळाली. करोत्तर नफा वार्षिक पातळीवर ८१ टक्क्यांनी वाढून ४०२८ दशलक्ष रुपयांवर गेला आहे. कंपनीच्या इतिहासात तिमाहीत नोंदवण्यात आलेला हा सर्वाधिक नफा आहे. करोत्तर नफ्याचे तिमाहीतील मार्जिन १०.४ टक्के आहे.