पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनीने आज ३० जून २०२३ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीतील उत्पन्न वार्षिक पातळीवर ४२ टक्क्यांनी वाढून ३८,८९४ दशलक्ष रुपयांवर पोहोचले आहे. या कामगिरीविषयी पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इंदर टी. जयसिंघानी म्हणाले, ‘आर्थिक वर्षाची आमची सुरुवात कमालीची चांगली झाली आहे. पहिल्या तिमाहीतील आतापर्यंतचे सर्वोत्तम निकाल आणि नफा आम्ही नोंदवला आहे. सरकार पायाभूत सुविधा आणि संरचनात्मक सुधारणांवर भर देत असून, खासगी भांडवलातील सुधारणा आणि रियल इस्टेट क्षेत्रातील वाढत्या घडामोडींमुळे आमच्या यशाला चालना मिळाली व पर्यायाने निकालांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला. प्रोजेक्ट लीप आणि ग्राहकांना प्राधान्य देण्याचे आमचे धोरण, दर्जेदार उत्पादनांची श्रेणी व दमदार वितरण नेटवर्क यांच्या एकत्रित परिणामांतूनही विकासाला चालना मिळाली. तिमाहीतील विलक्षण निकाल हे आमच्या दमदार व्यावसायिक मॉडेलला मिळालेली पावती आहे,’ असंही त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा