Post Office Fixed Deposit: अलीकडच्या काळात बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर व्याजदर वाढवले आहेत, ज्यामुळे निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी ते अधिक फायदेशीर ठरत आहेत. व्याजदरात नुकत्याच झालेल्या वाढीनंतर आता मुदत ठेव हा महागाईला तारणारा पर्याय बनत चालला आहे. मजबूत एफडी पोर्टफोलिओ तयार करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुमचे सर्व पैसे एकाच योजनेत गुंतवण्याऐवजी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अल्प आणि दीर्घकालीन एफडीमध्ये गुंतवणूक करणे होय. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० C अंतर्गत कर लाभ उपलब्ध असलेल्या ५ वर्षांच्या FD मध्ये एक भाग गुंतवा. तरलता लक्षात घेऊन उरलेले पैसे वेगवेगळ्या शॉर्ट टर्म एफडीमध्ये गुंतवू शकता. जर तुम्हाला असे करायचे असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीमसाठी गुंतवणूक करू शकता, जेथे वेगवेगळ्या कालावधीचे ४ पर्याय उपलब्ध आहेत.
१ वर्ष ते ५ वर्षांचा पर्याय
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना ही मुदत ठेवीचा एक प्रकार आहे. १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांची एफडी करण्याचा पर्याय आहे. या विविध कालावधीच्या योजनांमध्ये ७.५ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. ज्या गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम अजिबात घ्यायची नाही आणि ठेवी सुरक्षित ठेवून चांगला परतावा हवा आहे ते पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकतात.
१ वर्ष TD: ६.८ % वार्षिक व्याज
ठेव : १० लाख रुपये
कालावधी : १ वर्ष
व्याज : ६.८% प्रतिवर्ष
मॅच्युरिटीवर रक्कम: १०,६९,७५४
व्याजाची रक्कम: ६९,७५४
२ वर्ष TD: ६.९% वार्षिक व्याज
ठेव : १० लाख रुपये
कालावधी : २ वर्षे
व्याज: ६.९% प्रतिवर्ष
मॅच्युरिटीवर रक्कम: ११,४६,६२५ रुपये
व्याजाची रक्कम: १,४६,६२५ रुपये
३ वर्षे TD: ७ % वार्षिक व्याज
ठेव : १० लाख रुपये
कालावधी : ३ वर्षे
व्याज : ७ % प्रतिवर्ष
मॅच्युरिटीवर रक्कम: १२,३१,४३९ रुपये
व्याजाची रक्कम: २,३१,४३९ रुपये
५ वर्ष TD: ७.५% वार्षिक व्याज
ठेव : १० लाख रुपये
कार्यकाळ : ५ वर्षे
व्याज : ७.५% प्रतिवर्ष
मॅच्युरिटीवर रक्कम: ४,४९,९४८ रुपये
व्याजाची रक्कम: ३,८३,००० रुपये
योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे
यात एकल आणि संयुक्त खाती उघडण्याची सुविधा आहे. संयुक्त खात्यात ३ प्रौढ असू शकतात.
या योजनेची खास गोष्ट म्हणजे एक गुंतवणूकदार अनेक खाती उघडू शकतो.
किमान १००० रुपये जमा केल्यावर कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. कमाल ठेवीवर मर्यादा नाही.
या योजनेत ५ वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो.
खाते सुरक्षितता म्हणून ठेवून त्याऐवजी तुम्ही कर्जही घेऊ शकता.
सरकारी ठेव असल्याने कोणताही धोका नाही.
एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते हस्तांतरित केले जाऊ शकते.
बँक एफडीपेक्षा अधिक सुरक्षित
ही बँक एफडीपेक्षा सुरक्षित गुंतवणूक आहे, कारण ती गुंतवणूकदाराच्या भांडवलावर आणि कमावलेल्या व्याजावर सरकारी हमी देते. तर बँक एफडीमध्ये डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) च्या नियमांनुसार तुम्हाला भांडवल आणि व्याजावर जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते.
हेही वाचाः HDFC बँकेकडून दोन विशेष FD योजना सुरू, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘इतका’ परतावा
पोस्ट ऑफिस टीडी सुविधा येथे उपलब्ध
पोस्ट ऑफिस टीडी येथे नामांकन सुविधा
एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते हस्तांतरित करण्याची सुविधा
एकाच पोस्ट ऑफिसमध्ये अनेक टीडी उघडण्याची सुविधा
एकल खाते संयुक्त खात्यात रूपांतरित करण्याची सुविधा
खाते विस्तार सुविधा
इंट्रा ऑपरेटेबल नेटबँकिंग / मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा