बेंगळूरु : प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) लवकरच भांडवली बाजारात प्रवेश नियोजित असलेल्या ओला इलेक्ट्रिकचे पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून स्व-निर्मित लिथियम-आयन बॅटरी संचासह ई-स्कूटर्स बाजारात आणण्याचे लक्ष्य आहे. या आयात-पर्यायी स्वनिर्मित बॅटरी संचामुळे दुचाकीच्या उत्पादन खर्चात तब्बल ३५ ते ४० टक्क्यांची बचत होऊन, भारतात अधिक किफायतशीर ई-वाहने उपलब्ध होऊ शकतील.

स्वदेशी विकसित बॅटरी सेल कंपनीच्या सध्या बांधकाम सुरू असलेल्या कृष्णगिरी, तमिळनाडूस्थित ओला गिगाफॅक्टरीमध्ये तयार केले जातील. ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि ईव्ही उत्पादन खर्चही कमी होईल. या प्रकल्पाच्या ५ गिगावॅट प्रति तास क्षमतेच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ८३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अगरवाल यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ‘पुढील वर्षाच्या सुरुवातीस आमच्या स्कूटरमध्ये स्वतःचे सेल असतील. ज्यातून आम्ही आमच्या ईव्हीची किंमतदेखील कमी करू शकतो,’ असे ते म्हणाले. ५ गिगावॅट स्थापित क्षमतेतून दरसाल १५ लाख दुचाकींची गरज पूर्ण केली जाईल, म्हणजेच ओला इलेक्ट्रिकद्वारे निर्मित दुचाकींमध्ये १०० टक्के स्व-निर्मित बॅटरी वापरल्या जातील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?

हेही वाचा >>>बाजार अस्थिरतेत गुंतवणूक कशी कराल? मुंबई विद्यापीठाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे आयोजन

बाजार नियामक ‘सेबी’ने ओला इलेक्ट्रिकच्या प्रस्तावित आयपीओला नुकताच हिरवा कंदील दिला आहे. कंपनीकडून सेबीकडे दाखल मसुदा प्रस्तावानुसार, ओला गिगाफॅक्टरीची क्षमता आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेरीस ५ गिगावॉटवरून ६.४ गिगावॉटपर्यंत वाढवण्यासाठी ‘आयपीओ’द्वारे उभारल्या जाणाऱ्या निधीपैकी १,२२६ कोटी रुपये वापरण्याचे नियोजन कंपनीने मांडले आहे. क्षमतेत वाढीनंतर, त्रयस्थ ई-दुचाकी निर्मात्या आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना ओला बॅटरींचा पुरवठा केला जाईल, असे भाविश अगरवाल म्हणाले. सध्या ओला ई-स्कूटरमध्ये वापरात येणाऱ्या २१-७० धाटणीच्या सेलपेक्षा पाच पटीने अधिक ऊर्जा क्षमता असणाऱ्या ४८-८० धाटणीच्या प्रगत सेलच्या वापरासाठी कंपनी प्रयत्नशील असून, पुढील सहा महिन्यांत चाचण्या-प्रयोग पूर्ण केल्यानंतर त्यांचे वाणिज्यिक उत्पादन सुरू होऊ शकेल. त्यापुढे जाऊन सॉलिड स्टेट बॅटरीच्या वापराच्या दिशेने कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यासंबंधाने आताच काही भाष्य करणे घाईचे ठरेल, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले.

पूर्णपणे महिला कामगारांकडूनच निर्मिती

ओला फ्युचरफॅक्टरी नावाच्या ई-स्कूटर निर्मिती प्रकल्पाच्या असेंब्ली लाइनवर केवळ महिला कामगारांच्या वापराच्या धोरणाची पुनरावृत्ती नवीन बॅटरी सेल निर्मितीच्या गिगाफॅक्टरीतही केली जाईल. सध्या फ्युचरफॅक्टरीमध्ये तीन पाळ्यांमध्ये जवळपास ४,००० महिला कामगार कार्यरत आहेत. ‘महिला कर्मचाऱ्यांबाबत आमचा अनुभव खूपच चांगला राहिला आहे. त्या वक्तशीर असण्यासह, अधिक शिस्तीने काम करत असल्याने आगामी प्रकल्पांबाबतही पूर्णपणे स्त्री-केंद्रित धोरण कायम राहील,’ असे भाविश अगरवाल यांनी स्पष्ट केले. आयफोनची असेंब्ली करणाऱ्या तमिळनाडूतील प्रकल्पात विवाहित महिलांना घेण्यास नकार देणाऱ्या फॉक्सकॉनच्या ताज्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ओला इलेक्ट्रिकचे हे धोरण विशेष लक्षणीय ठरते.