पीटीआय,नवी दिल्ली
वॉलमार्टची उपकंपनी आणि डिजिटल देयक अॅप असलेल्या ‘फोनपे’ने भांडवली बाजरात सूचिबद्ध होण्यासाठी प्रारंभिक समभाग विक्रीची (आयपीओ) तयारी सुरू केली आहे, असे कंपनीने गुरुवारी सांगितले. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या अखेरच्या निधी फेरीत कंपनीचे मूल्य १२ अब्ज अमेरिकी डॉलर होते.
कंपनी तिच्या संभाव्य आयपीओच्या संदर्भात तयारीची पावले उचलत आहे आणि भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याची योजना आखत आहे. या वर्षी तिचा १० वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या कंपनीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘फोनपे’ने लाखो ग्राहकांना नाविन्यपूर्ण वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञान उपायांसह सेवा पुरवत आहे.