मुंबई : सामान्यतः मांसाहारी थाळीची किंमत शाकाहारापेक्षा दुप्पट असते, मात्र सरलेल्या सप्टेंबर महिन्यात विपरीत चित्र दिसून आले. कांदे, बटाटे व टोमॅटोच्या किमती कडाडल्यामुळे घरगुती बनवलेल्या चिकन थाळीपेक्षा अधिक, शाकाहारी थाळीची सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढली. ब्रॉयलर चिकनच्या किमतीतील घटीने यात हातभार लावला.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स’च्या अहवालाने शाकाहार महागण्यामागील कारणांचा वेध घेतला आहे. कांदा आणि बटाट्याची आवक कमी झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये या जिनसांसह, टोमॅटोच्या किमती अनुक्रमे ५३ टक्के, ५० टक्के आणि १८ टक्क्यांनी वाढल्या. मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. वार्षिक तुलनेत नव्हे, तर आधीच्या महिन्याच्या तुलनेतही भाज्यांची दरवाढ ही एकंदर किंमतवाढीस कारणीभूत ठरली आहे.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

हेही वाचा >>> परकीय चलन गंगाजळी प्रथमच ७०० अब्ज डॉलरपुढे

शाकाहारी थाळीची किंमत सप्टेंबर २०२३ मधील २८.१ रुपयांवरून यंदाच्या सप्टेंबरमध्ये ११ टक्क्यांनी वाढून ३१.३ रुपयांवर गेली आणि आधीच्या ऑगस्टमध्ये ती ३१.२ रुपये होती. थाळीच्या किमतीत ३७ टक्के वाटा असलेल्या भाज्यांच्या किमती वाढल्याने एकंदरीत शाकाहारी थाळी महागली आहे. बरोबरीने डाळींचे उत्पादन घटल्यामुळे त्यांच्या किमतीही वार्षिक तुलनेत १४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कपातीमुळे इंधनाचे दर ११ टक्क्यांनी घसरले आहेत. मांसाहारी थाळीच्या बाबतीत, ५० टक्के योगदान असलेल्या ब्रॉयलरच्या किमतीत १३ टक्क्यांनी घट झाल्याने त्या थाळीची किंमत वर्षभरात २ टक्क्यांनी घसरून ५९.३ रुपये झाली आहे.

Story img Loader