मुंबईतील घरांच्या किमती हा विषय नेहमीच चर्चेचा राहिला आहे. मुंबईत एकीकडे परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प सुरू होत असताना दुसरीकडे म्हाडाच्या लॉटरीत लागणाऱ्या काही घरांच्या किमतीही आवाक्याबाहेर जाऊ लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मु्ंबईतली घरं हळूहळू सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली असताना मुंबईच्या रीअल इस्टेट क्षेत्रात बंपर व्यवहार झाल्याची बाब समोर आली आहे. इकोनॉमिक्स टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत नुकताच दोन आलिशान फ्लॅटचा व्यवहार झाला असून त्याची किंमत तब्बल १७० कोटींच्या घरात आहे. ३६० वन वित्तीय सेवा कंपनीचे संस्थापक व CEO करण भगत यांनी हे दोन फ्लॅट विकत घेतले आहेत.

मुंबईच्या वरळी भागातील डॉ. अॅनी बेझंट रोडवर ओबेरॉय रिअॅल्टीचा हा गृहप्रकल्प आहे. थ्री सिक्स्टी वेस्ट असं या प्रकल्पाचं नाव असून करण भगत यांनी घेतलेले दोन फ्लॅट या प्रकल्पातील इमारतीच्या अनुक्रमे ४५ आणि ४६व्या मजल्यावर आहेत. हे दोन्ही फ्लॅट सी फेसिंग असून त्यांची एकत्रित किंमत तब्बस १७० कोटी रुपये इतकी आहे! या फ्लॅटच्या नोंदणीसाठी करण भगत यांनी तब्बल ६ कोटी ४४ लाख रुपये इतकी रक्कम भरली आहे.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज
1406 trees will be cut for metro 9 car shed on Dahisar Miraroad Metro route
मेट्रो ९ च्या डोंगरी कारशेडसाठी १,४०० झाडांची कत्तल; पर्यावरणज्ज्ञ, पर्यावरणप्रेमींचा विरोध

१२,८९६ चौरस फूट, चार कार पार्किंग आणि १७० कोटी!

यातल्या ४५व्या मजल्यावरील फ्लॅटची किंमत ८५ कोटी ३० हजार इतकी आहे. या फ्लॅटचा एकूण बिल्टअप एरिया ६ हजार ४४८ चौरस फूट इतका आहे. या फ्लॅटसोबत करण भगत यांना चार कार पार्किंग मिळाले आहेत. २२ मे रोजी या फ्लॅटचा व्यवहार झाला. ४६व्या मजल्यावर खरेदी करण्यात आलेल्या फ्लॅटची किंमतही ८५ कोटी ३० हजार इतकी आहे. या फ्लॅटचा बिल्टअप एरियाही तेवढाच असून त्यासोबतही चार कार पार्किंग मिळाले आहेत. त्यामुळे या दोन्ही फ्लॅटचे मिळून तब्बल ८ कार पार्किंग करण भगत यांना मिळाले आहेत. त्याशिवाय, दोन्ही फ्लॅटचा एकूण बिल्टअप एरिया जवळपास १२ हजार ८९६ चौरस फूट इतका आहे.

पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहा फक्त एका मिस्ड कॉलवर; काय आहे नंबर अन् प्रोसेस? घ्या जाणून

मुंबईत घराची सरासरी किंमत…

फ्री प्रेस जर्नलनं मुंबईतील घरांच्या किमतींबाबत दिलेल्या आकडेवारीनुसार शहरातील १ बीएचके फ्लॅटची सरासरी किंमत ६५.५ लाखांच्या घरात आहे. २ बीएचके फ्लॅटची सरासरी किंमत १.५ कोटी तर ४ बीएचके फ्लॅटची सरासरी किंमत तब्बल ९ कोटींच्या घरात आहे.

Story img Loader