रिलायन्स येत्या १० वर्षे गुजरातच्या हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करत राहणार आहे. २०३० पर्यंत रिलायन्स गुजरातच्या हरित ऊर्जेच्या वापरापैकी जवळपास निम्मे उत्पादन करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये ही घोषणा केली. गुजरातमधील हरित विकासात जागतिक नेता म्हणून उदयास येण्यासाठी रिलायन्सने जामनगरमध्ये ५ हजार एकरमध्ये धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे.

रिलायन्सने देशात सुमारे १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली – मुकेश अंबानी

मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील, असे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात हरित नोकऱ्या निर्माण होतील आणि हरित उत्पादने आणि सामग्रीचे उत्पादन सक्षम होईल, ज्यामुळे गुजरात हरित उत्पादनांचे प्रमुख निर्यातदार राज्य बनेल. गुजरातला आपली मातृभूमी आणि कार्यस्थळ असल्याचे सांगताना मुकेश अंबानी म्हणाले की, गेल्या १० वर्षांत रिलायन्सने देशात सुमारे १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये झाली आहे. ७ कोटी गुजरातींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रिलायन्स कोणतीही कसर सोडणार नाही.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
union home minister amit shah slams sharad pawar
‘पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०० साखर कारखाने मृत्युपंथाला’, अमित शहा यांचा हल्लाबोल
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

हेही वाचाः गौतम अदाणी गुजरातमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार; व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये घोषणा

नरेंद्रभाई मोदी हे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत, आमचे प्रिय नेते आणि सध्याच्या काळात महान जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. ते भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत.परदेशातील माझे मित्र मला विचारतात की लाखो भारतीय ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा घोषणा देत आहेत, त्याचा अर्थ काय आहे? मी त्यांना सांगतो याचा अर्थ असा, की भारताचे पंतप्रधान त्यांच्या दूरदृष्टीने, दृढनिश्चयाने अशक्य ते सर्व शक्य बनवतात, असंही मुकेश अंबानी म्हणाले आहेत.

हेही वाचाः २०४७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ३० अब्ज डॉलर्सची होणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची घोषणा

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट १२ जानेवारीपर्यंत चालणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन केले. ही व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट १० ते १२ जानेवारी दरम्यान चालणार आहे. या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची थीम ‘गेटवे टू द फ्युचर’ आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची ही दहावी आवृत्ती आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये ३४ देश आणि १६ संस्था सहभागी होत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची पहिली आवृत्ती २००३ मध्ये आयोजित करण्यात आली होती. २००३ साली तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते या शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी देशाचे विद्यमान पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.