नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँका (पीएसबी) आणि वित्तीय संस्थांनी एक महिना चाललेल्या विशेष मोहिमेदरम्यान भंगार विल्हेवाटीच्या माध्यमातून ४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या महिन्यात २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. आर्थिक सेवा विभागने ही विशेष मोहीम राबवत जागेचे नियोजन (स्पेस मॅनेजमेंट), ग्राहक-केंद्रित उपक्रम, पर्यावरण स्वच्छ आणि वृक्षांची लागवड, महत्वाच्या कागदपत्रांचे संगोपन- व्यवस्थापन आणि भंगाराची विल्हेवाट लावणे याला प्रोत्साहन दिले, असे वित्त मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Muhurat Trading Day: सवंत्सर २०८१ बक्कळ लाभाचे… मुहूर्ताला सेन्सेक्सची ३३५ अंशांची कमाई

यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक. विमा कंपन्या, नाबार्ड, सिडबी, एक्झिम बँक यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांच्या सर्व संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. याबरोबरच सार्वजनिक तक्रारी, सार्वजनिक अपील या संदर्भांतील तक्रारींचे निराकरण केले, असे त्यात म्हटले आहे. तब्बल ११.७९ लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे आणि भंगार विल्हेवाटीच्या माध्यमातून ४.५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, असे सांगून देशभरातील ३८,५०० हून अधिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान, १२ सरकारी बँका आणि ४३ प्रादेशिक ग्रामीण बँकांनी पेन्शन तक्रार सप्ताह आयोजित केला होता. देशभरातील ५२,२०८ पेक्षा जास्त शाखांमध्ये अंदाजे १.४५ लाख निवृत्ती वेतनधारकांशी संपर्क साधण्यात आल्याचा दावा त्यात करण्यात आला. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसीने १२.७७ लाख दावा न केलेल्या (अनक्लेम) पॉलिसी निकाली काढल्या आणि १०,७४२ कोटींहून अधिक दावे निकाली काढले, असेही त्यात म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psu banks and financial institutions earn rs 4 5 cr through scrap disposal print eco news zws