पुणे: पुणेस्थित इंडिकस सॉफ्टवेअर कंपनीने जपानमधील सेको सोल्यूशन्सशी भागीदारी केली आहे. मोटारींसाठी अत्याधुनिक संपर्क यंत्रणा बनविण्यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. सेको सोल्यूशन्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जून सेकिन आणि इंडिकसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा व्यापारी यांनी बुधवारी या भागीदारीची घोषणा केली.
हेही वाचा >>> निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकांपासून अवघा अर्धा टक्का दूर; ‘फेड-कपात’ आशावादाने प्रेरित तेजी सलग आठव्या सत्रात
मोटार उत्पादक कंपन्या आणि मोटारी भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना सेकोकडून अत्याधुनिक संपर्क यंत्रणा पुरविली जाते. या संपर्क यंत्रणेच्या विकासात इंडिकस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मोटारींमध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक संपर्क यंत्रणेमुळे तिच्यावर देखरेख ठेवणे सोपे जाते. यामुळे मोटारीच्या वेगासोबत चालकाचे नियम उल्लंघन आणि इतर अनेक बाबी तातडीने निदर्शनास येतात. सध्या इंडिकसकडून कंटिनिओ ही संगणक प्रणाली मोटार उत्पादक कंपन्या आणि मोटारी भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना पुरविली जात आहे. सेकोसोबतच्या भागीदारीमुळे इंडिकसला जपानमधील बाजारपेठेत विस्तार करता येणार आहे. आगामी काळात बदलत्या तंत्रज्ञानासोबत मोटारीतील संपर्क यंत्रणेत मोठा बदल होणार आहे. त्यातून या क्षेत्राचे रूप पालटेल, असे शिल्पा व्यापारी यांनी सांगितले.