पुणे : ऑनलाइन खरेदी करण्याचे पुणेकरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये गृहोपयोगी उत्पादने, स्वयंपाकघरासाठी उपयुक्त उपकरणे आणि इतर वस्तूंच्या खरेदीत पुण्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ७० टक्के वाढ नोंदविण्यात आली.
याबाबत ॲमेझॉन इंडियाचे संचालक के. एन. श्रीकांत म्हणाले की, ॲमेझॉनवर राज्यातील ग्राहकांच्या संख्येत यंदा ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये दीडपट वाढ नोंदविण्यात आली. याच वेळी पुण्यातील ग्राहकांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे.
हेही वाचा >>> खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट, बोनस केला जाहीर
राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ग्राहक हे छोट्या शहरांतील आहेत. याचबरोबर राज्यातून सर्वाधिक नवीन ग्राहक ॲमेझॉनला मिळाले आहेत. गृहोपयोगी उत्पादने, स्वयंपाकघरासाठीची उपकरणे आणि आऊटडोअर श्रेणीतील उत्पादनांना ग्राहकांची पसंती आहे. याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांनाही ऑनलाइन मागणी वाढत आहे. देशातील २० शहरांमध्ये ॲमेझॉनकडून ई-वाहने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकूण ई-वाहनांच्या ग्राहकांमध्ये पुण्यातील ग्राहकांचे प्रमाण २५ टक्के आहे. आता कंपनीने इमारतीच्या रंगाची नवीन श्रेणी उपलब्ध केली आहे. त्यात एक हजारहून अधिक रंगछटा आहेत. ग्राहकांना योग्य तो रंग निवडता यावा, यासाठी ‘पेंट फाइंडर टूल’ही ग्राहकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे श्रीकांत यांनी नमूद केले.