पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणुकीचा ओघ सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात घटला आहे. या तिमाहीत उद्योगाने ३४,७६५ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. त्याआधीच्या तिमाहीत ही गुंतवणूक १ लाख ८५ हजार कोटी रुपये होती. रोखेसंलग्न अर्थात डेट फंडातून पैसे काढून घेण्याचे प्रमाण वाढल्यानेही एकंदर गुंतवणुकीला गळती लागली आहे.
‘मॉर्निंगस्टार इंडिया’ने याबाबत तयार केलेल्या अहवालानुसार, निश्चित उत्पन्न अथवा रोखेसंलग्न (डेट) प्रकार वगळता सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडांमध्ये जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत गुंतवणूक वाढली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाने जुलै महिन्यात ८२ हजार ४६७ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक अनुभवली. नंतर ऑगस्टमध्ये त्यात घट होऊन ती १६ हजार ८१० कोटी रुपयांवर आली.
हेही वाचा… सप्टेंबरअखेर रखडलेल्या ४१७ पायाभूत प्रकल्पांच्या खर्चात ४.७७ लाख कोटींनी वाढ
अखेर सप्टेंबर महिन्यामध्ये या उद्योगातून ६३ हजार ८८२ कोटी रुपये काढून घेण्यात आले. मागील काही वर्षांत प्रत्येक तिमाहीत म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत मोठे चढ-उतार होत आहेत. जूनअखेर संपलेल्या तिमाहीत झालेली गुंतवणूक ही चार वर्षांतील उच्चांकी ठरली होती. म्युच्युअल फंड घराण्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सप्टेंबरअखेर ४६.२२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्याआधीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात ५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेसमोर सध्या रशिया-युक्रेन युद्ध, अनेक देशांमध्ये वाढत चाललेली महागाई आणि मध्यवर्ती बँकांकडून अपरिहार्य असलेली व्याजदर वाढ ही आव्हाने आहेत. इतर देशांपेक्षा भारतातील बाजारपेठेची कामगिरी चांगली आहे. अनेक देशांमध्ये मोठे आर्थिक चढ-उतार दिसून येत आहेत. – मेल्वीन सँटारिटा, विश्लेषक, मॉर्निंगस्टार इंडिया