केंद्राकडून डिजिटल व्यक्तिगत विदा संरक्षण (डीपीडीपी) विधेयकाची तयारी ही सर्व संबंधित पक्षांशी विस्तृत सल्लामसलतीने सुरू असून, त्यायोगे विशेषतः ग्राहकांच्या विदा स्थानिकीकरणासारख्या मु्द्यावर बँकिंग आणि आरोग्य या सारख्या क्षेत्रीय नियामकांच्या प्रचलित नियमांवर गदा आणली जाणार नाही, हे काटेकोरपणे पाहिले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिली.

इंडियन एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या वित्तीय दैनिकाद्वारे आयोजित ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चंद्रशेखर यांनी प्रस्तावित विदा संरक्षण कायद्यात सर्व क्षेत्रीय नियामकांच्या चिंता व समस्यांनाही ध्यानात घेतले गेले असल्याचे सांगितले. सायबर जगताचे प्रदेश-सीमांचे बंधन झुगारून देणारे स्वरूप पाहता, केवळ विदा संरक्षणाच्या दृष्टीने असुरक्षित ठरणाऱ्या भौगौलिक क्षेत्रात विदा जतनाला मुभा न देण्याचे सुरक्षाविषयक श्वेतसूची (व्हाइट-लिस्टिंग) धोरणाचा अवलंब केला जाणार आहे. ही बाब वित्तीय सेवा प्रदात्यांना देशांतील ग्राहकांचा विदा स्थानिक स्वरूपातच जतन करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या आड येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’चे कार्यकारी संपादक (कॉर्पोरेट्स) ऋषी राज यांच्याशी वार्तालापात पुढे आलेल्या प्रश्नाला उत्तरादाखल त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Supreme Court on Creamy Layer
“…त्यांना आता आरक्षणाबाहेर ठेवायला हवं”, सर्वोच्च न्यायालयाचं रोखठोक मत; म्हणाले, “७५ वर्षांपासून…”
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
Pune Municipal Corporation news in marathi
नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे बंधारे पालिका का काढणार, हे आहे कारण !
Central Election Commissioner refutes opposition allegations no discrepancy in counting of ballot papers
मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा

हेही वाचा… स्पाईसजेटमधील हिस्सा गंगवाल विकत घेणार

दोन-अडीच वर्षे अभूतपूर्व संधीची

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पुढील दोन ते तीन वर्षे ही देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला आकार देणारी बहुमोल व अभूतपूर्व संधीची वर्षे ठरतील. इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व क्षेत्रात सध्या दररोज गुंतवणुकीचे नवनवीन प्रस्ताव दाखल होत आहेत. अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अनुसरलेल्या ‘चीन प्लस वन’ अर्थात चीनला पर्यायी ठरेल अशा नव्या ठिकाणांचा शोध घेणाऱ्या धोरणाचे टोक हे भारतात याच तीन वर्षात पूर्णत्वाला येईल. इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर चिपनिर्मिती, एआय साधने अशा सर्वच क्षेत्रात अनेक प्रकल्प मार्गी लागतील आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणखी पाच वर्षे सत्ता राहिल्यास, २०२९ साली उन्नत, गतिमान आणि विकसित भारत आकाराला आल्याचे पाहता येईल, असे चंद्रशेखर यांनी सांगितले.

हेही वाचा… व्यापार तूट पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; सप्टेंबरमध्ये ३० टक्के घसरणीसह १९.३७ अब्ज डॉलरवर मर्यादित

देशाच्या बँक, वित्त आणि नव्या युगाच्या फिनटेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका, समूह मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस, पुरस्कारार्थींच्या निवडीसाठी स्थापित परीक्षक मंडळाचे अध्यक्ष टीसीएसचे माजी उपाध्यक्ष एस. रामदुरई, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र म्हैसकर, नॉलेज भागीदार ‘ईवाय’चे अधिकारी आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या चेहऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचा… आघाडीच्या आयटी कंपन्यांतील मनुष्यबळात घट; टीसीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेकमध्ये नवीन भरती कमी

डिजिटल अर्थव्यवस्था आगामी वाढीचे इंजिन – कामथ

भारताच्या अर्थव्यवस्थेला ६.५ टक्क्यांची वाढ चालू व पुढील वर्षात गाठता येईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह सर्वांचेच कयास आहेत. पण वाढीचा दर हा ८ टक्क्यांवर जाऊ शकेल आणि मधले अंतर हे कमालीच्या वेगाने वाढत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेकडून मिळणाऱ्या योगदानातून भरून येईल, असा विश्वास ‘नॅबफिड’चे अध्यक्ष के. व्ही. कामथ यांनी व्यक्त केला. ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’चे संपादक श्यामल मजूमदार यांच्याशी झालेल्या वार्तालापात त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानातील देशातील प्रगती व नवप्रयोगांचे कौतुक केले. देयक व्यवहाराच्या सुविधांमध्ये आपण विकसित मानल्या पश्चिमी देशांच्या तुलनेत किती तरी पुढे मजल मारली असून, जगातील अनेक देश भारतीय प्रणालीचे अनुकरण करू पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारार्थींची सूचीः

जीवनगौरव पुरस्कार

चंद्रशेखर घोष

बंधन बँक (व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी)

बँकर ऑफ द इयर

दिपक गुप्ता

कोटक महिंद्र बँक (सह-व्यवस्थापकीय संचालक)

विशेष परीक्षक पुरस्कार

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्तम बँक

बँक ऑफ महाराष्ट्र

सर्वोत्तम खासगी बँक

एचडीएफसी बँक

सर्वोत्तम परदेशी बँक

सिटी बँक

सर्वोत्तम बॅंकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी )

बजाज फायनान्स

डिजिटल बँक ऑफ द इयर

आयडीएफसी फर्स्ट बँक

सर्वोत्तम स्मॉल फायनान्स बँक

एयू स्मॉल फायनान्स बँक

सर्वोत्तम बचत उत्पादन

बँक ऑफ बडोदा

सर्वोत्तम फिनटेक- विमा

ऍको जनरल इन्शुरन्स लिमिटेड

सर्वोत्तम फिनटेक- गुंतवणूक

झिरोधा

सर्वोत्तम फिनटेक – देयक व्यवहार

फोनपे

सर्वोत्तम फिनटेक – नियमन तंत्रज्ञान

फिनटेलिक्स

सर्वोत्तम फिनटेक – कर्ज वितरण

लेन्त्रा डॉट एआय

Story img Loader