पश्चिम बंगालच्या सिंगूर जमीन वादात रतन टाटा यांच्या टाटा मोटर्सला मोठा विजय मिळाला आहे. मात्र, हा विजय पश्चिम बंगाल सरकारच्या ममता बॅनर्जी यांच्यासाठीही मोठा धक्का आहे. सिंगूर वादातील विजयानंतर बंगाल सरकार आता टाटा मोटर्सला ७६६ कोटी रुपयांची भरपाई देणार आहे. सिंगूर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधील नुकसान भरून काढण्यासाठी बंगाल सरकार टाटा मोटर्सला ७६६ कोटी रुपयांची भरपाई देणार आहे. पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाला नुकसानभरपाई देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण सिंगूर प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ यात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः मोठी बातमी! ८१.५ कोटी भारतीयांचा आधार अन् पासपोर्ट संबंधित डेटा लीक

२००८ ची ही घटना

२००८ मध्ये टाटा मोटर्सला जमिनीच्या वादामुळे पश्चिम बंगालमधील सिंगूर येथून गुजरातमधील सानंद येथे उत्पादन प्रकल्प हस्तांतरित करावा लागला. मात्र, तोपर्यंत टाटा मोटर्सने सिंगूरमध्ये १००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती. जमिनीच्या वादामुळे टाटा मोटर्सला आपला प्लांट येथून गुजरातला हलवावा लागला. टाटाची छोटी कार नॅनो गुजरातमधील सिंगूर प्लांटमध्ये तयार केली जाणार होती.

हेही वाचाः ‘तुमची सुरक्षा कितीही मजबूत असली तरी…’ मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी, ईमेलद्वारे मागितले ४०० कोटी

टाटा मोटर्सने माहिती दिली

टाटा मोटर्सने शेअर बाजाराला सांगितले की, तीन सदस्यीय लवाद न्यायाधिकरणाने आपल्या बाजूने निकाल दिला आहे. निकालानुसार, कंपनीला प्रतिवादी पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेड (WBIDC) कडून ११ टक्के वार्षिक व्याजासह ७६५.७८ कोटी रुपये वसूल करण्याचा अधिकार आहे. १ सप्टेंबर २०१६ पासून नुकसानभरपाईच्या तारखेपर्यंत व्याजाची गणना केली जाते. सिंगूर प्लांट बंद पडल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी टाटा मोटर्सने WBIDC कडे भरपाई मागितली होती. यामध्ये गुंतवणुकीच्या नुकसानासह इतर बाबींवर दावे करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata big win bengal government to pay rs 766 crore compensation to tata motors in singur dispute vrd
Show comments