Industrialist Ratan Tata Died at 86 : प्रसिद्ध उद्योगपती, टाटा सन्सचे अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाला दुःख झालं असून प्रत्येकजण त्यांच्याप्रती असलेली आठवण आणि आदर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत. ते अजातशत्रू असल्याने त्यांच्या व्यावसायिक स्पर्धकांशीही त्यांचे चांगले संबंध होते. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनीही त्यांच्याप्रती शोक व्यक्त केला आहे.
रतन टाटा यांच्या निधनानमुळे त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. रतन टाटा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे एक विशाल, दूरदर्शी व्यक्तीमत्त्व भारताने गमावले आहे. रतन टाटा हे केवळ एक व्यावसायिक नेते नव्हते, त्यांनी भारताच्या अखंडतेला, करुणा आणि चांगल्या गोष्टींना मूर्त रुप दिले. त्यांच्यासारखे दिग्गज कधीच मावळत नाहीत.”
India has lost a giant, a visionary who redefined modern India's path. Ratan Tata wasn’t just a business leader – he embodied the spirit of India with integrity, compassion and an unwavering commitment to the greater good. Legends like him never fade away. Om Shanti ? pic.twitter.com/mANuvwX8wV
— Gautam Adani (@gautam_adani) October 9, 2024
हेही वाचा >> Ratan Tata Death : “रतन टाटा विलक्षण माणूस होते”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
आनंद महिंद्रा यांनीही वाहिली श्रद्धांजली
आनंद महिंद्रा यांनीही एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर रतन टाटांविषयी पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “रतन टाटा यांची अनुपस्थिती मला स्वीकरता येत नाहीय. भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. आणि रतन टाटा यांच्या जीवनाचा आणि कार्याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी खूप संबंध आहे. त्यामुळे या वेळी त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले असते. ते गेल्यावर, आपण फक्त त्यांच्या विचारांचं अनुकरण करू शकतो. कारण ते असे व्यापारी होते ज्यांच्यासाठी आर्थिक संपत्ती आणि यश हे जागतिक समुदायाच्या सेवेसाठी सर्वात जास्त उपयुक्त होते. तुम्हाला विसरलं जाणार नाही. कारण महापुरुष कधीच मरत नाहीत.”