मुंबई : परोपकारी रतन टाटा, यांचे विद्यमान ऑक्टोबर महिन्यात निधन झाल्यानंतर त्यांची दहा हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये अगदी त्यांच्या प्रिय श्वान टिटोपासून ते थेट दीर्घकाळचा स्वयंपाकी राजन शॉपर्यंत त्यांच्या इच्छापत्रात नावे नमूद करण्यात आले आहे. टाटा यांच्या आधीच्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर साधारण सहा वर्षांपूर्वी टिटो या श्वानाला दत्तक घेण्यात आले होते. त्याचा दीर्घकाळचा स्वयंपाकी राजन शॉ हे त्याची काळजी घेतील, आणि त्याची तजवीज रतन टाटा यांनी इच्छापत्रात केली आहे. पाळीव प्राण्यांसाठी संपत्ती बाजूला ठेवणे ही पाश्चिमात्य देशात एक सामान्य प्रथा आहे, परंतु भारतात ती दुर्मिळ आहे.

हेही वाचा >>> इंडसइंड बँकेच्या समभागात १९ टक्क्यांची घसरण; देशातील अव्वल दहा बँकांमधूनही गच्छंती

indusInd bank shares crash over 19 percent
इंडसइंड बँकेच्या समभागात १९ टक्क्यांची घसरण; देशातील अव्वल दहा बँकांमधूनही गच्छंती
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

विद्यमान महिन्यात ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटा, यांच्या मालमत्तेचे मूल्य १० हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, त्यांनी त्यांचे फाउंडेशन, भाऊ जिमी टाटा, सावत्र बहिणी शिरीन आणि डेना जेजीभॉय आणि घरातील कर्मचारी सदस्यांसह विविध लाभार्थ्यांना मालमत्तेत स्थान दिले आहे. टाटा यांच्या इच्छापत्रात त्यांचे बटलर सुब्बिया यांच्यासाठीही व्यवस्था आहे, ज्यांच्याशी त्यांचे तीन दशकांहून अधिक काळ घनिष्ट संबंध होते. याबरोबरच टाटा यांचे कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांचाही उल्लेख करण्यात आहे. अहवालानुसार, त्यांनी नायडू यांच्या सहयोगी उपक्रम, गुडफेलोजमधील आपली भागीदारी सोडली आहे.

हेही वाचा >>> परकीयांच्या विक्रीने बाजार बेजार ! करोनानंतरचा सर्वात घातक महिना

रतन टाटा यांच्या मालमत्तेमध्ये महाराष्ट्रातील अलिबाग येथे २,००० चौरस फुटांचा समुद्रकिनारी असलेला बंगला, मुंबईच्या जुहू तारा रोडवरील दोन मजली निवासस्थान आणि ३५० कोटींहून अधिक मुदत ठेवी यांचा समावेश आहे. १६५ अब्ज डॉलर्सच्या टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्समध्येही त्यांची ०.८३ टक्के भागीदारी आहे. चॅरिटेबल ट्रस्टला समभाग दान करण्याच्या टाटा समूहाच्या वारशानुसार, टाटा सन्समधील त्यांचा हिस्सा रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनकडे हस्तांतरित केला जाईल. टाटा सन्समधील हिश्श्याबरोबरच, टाटा मोटर्ससह टाटा समूहाच्या इतर उद्योगांमध्ये रतन टाटा यांचे स्वारस्य देखील रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनकडे जाईल. कुलाब्यातील हालेकाई घर, जिथे ते मृत्यूपर्यंत साहिले होते, ते टाटा सन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी, इवार्ट इन्व्हेस्टमेंट्सच्या मालकीचे आहे.

Story img Loader