रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आघाडीच्या डिजिटल बँक पेटीएम पेमेंट बँकेला २९ फेब्रुवारीपासून कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली आहे. पेटीएम पेमेंट बँकेला (PPBL) कोणत्याही ठेवी स्वीकारण्याची परवानगी दिली जाणार नाही किंवा ते कोणतेही प्रीपेड बिल पेमेंट, टॉप अप किंवा वॉलेट किंवा फास्टॅगसाठी ठेव स्वीकारण्यास सक्षम असणार नाही, असं मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. पेटीएम पेमेंट बँकेला वॉलेटसह कोणतेही क्रेडिट व्यवहार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. खातेधारक किंवा पेटीएम युजर्सनी याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण सेंट्रल बँक (RBI) ने म्हटले आहे की, पेटीएम ग्राहकांना त्यांची शिल्लक रक्कम काढण्यासाठी किंवा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः विप्रो कामगिरी सुधारण्यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

आरबीआयने हे पाऊल का उचलले?

रॉयटर्सच्या अहवालानुसार, आरबीआयने नियमांचे पालन न केल्यामुळे आणि इतर चिंतांमुळे पेटीएम पेमेंट्स बँकेला त्यांच्या सेवांवर नवीन ठेव आणि क्रेडिट व्यवहार स्वीकारण्यास प्रतिबंध केला आहे. लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी आढळून आल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आल्याचे आरबीआयने निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचाः केंद्र सरकारने १६ व्या वित्त आयोगाच्या चार सदस्यांची केली नियुक्ती

तुम्हाला कॅशबॅक आणि परतावा रक्कम मिळणार

आरबीआयने म्हटले आहे की, २९ फेब्रुवारी २०२४ नंतर पेटीएम पेमेंट बँकेद्वारे कोणतेही नवीन व्यवहार किंवा टॉप अप शक्य होणार नाही. मात्र, याद्वारे व्याज, कॅशबॅक किंवा रिफंडचे व्यवहार करता येतात.

ग्राहकांवर परिणाम काय?

* २९ फेब्रुवारीपासून पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये प्रीपेड साधने, वॉलेट्स, फास्टॅग वगळता अन्य ठेवी किंवा व्यवहारांना परवानगी नसले.

* बचत बँक खाती, चालू खाती, प्रीपेड साधने, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादीतून शिल्लक रक्कम काढण्यावर किंवा वापरण्यावर निर्बंध नाहीत. त्यामुळे खात्यांतील उपलब्ध शिल्लक रक्कम ग्राहकांना उपलब्ध असेल.

* निधी हस्तांतरणासाठी वापरले जाणारे एईपीएस, आयएमपीएस आणि यूपीआय या सुविधा सुरू राहतील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi bans paytm payments bank the bank will not accept any deposits from 29 february 2024 vrd