Bank Holiday March 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
३१ मार्च रोजी सरकारचे आर्थिक वर्ष संपते. म्हणजेच सरकारी महसूल, देयके आणि सेटलमेंटशी संबंधित सर्व व्यवहार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करणे आवश्यक असतं.
३१ मार्च २०२५ रोजी कोणत्या बँकिंग सुविधा सुरू असणार?
- प्राप्तिकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कासह सरकारी कर देयके.
- पेन्शन पेमेंट आणि सरकारी अनुदाने
- सरकारी वेतन आणि भत्त्यांचे वितरण
- सरकारी योजना आणि अनुदानांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार
या शहरांमध्ये बँका राहणार सुरू
शहरे/तारीख | १४ मार्च (होळी) | १५ मार्च | २२ मार्च (चौथा शनिवार) | ३० मार्च (गुढीपाडवा) | ३१ मार्च (ईद) |
मुंबई | सुट्टी | कार्यरत | सुट्टी | सुट्टी | सुट्टी रद्द |
नागपूर | सुट्टी | कार्यरत | सुट्टी | सुट्टी | सुट्टी रद्द |
नवी दिल्ली | सुट्टी | कार्यरत | सुट्टी | सुट्टी | सुट्टी रद्द |
पणजी | सुट्टी | कार्यरत | सुट्टी | सुट्टी | सुट्टी रद्द |
१ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी
१ एप्रिल (मंगळवार) रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बुहतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
एप्रिल २०२५ बँक सुट्ट्या (April 2025 Bank Holidays)
- १ एप्रिल – बँकांना त्यांची वार्षिक खाती बंद करण्यास करण्यासाठी
- ५ एप्रिल- बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिवस ५
- १० एप्रिल- महावीर जन्मकल्याणक/महावीर जयंती १०
- १४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/विशू/बिजू/बुईसू उत्सव/महाविशू संक्रांती/तमिळ नववर्ष दिन/बोहाग बिहू/चेराओबा(Bohag Bihu/Cheiraoba)
- १५ एप्रिल- बंगाली नवीन वर्षाचा दिवस/हिमाचल दिवस/बोहाग बिहू(Bohag Bihu)
- १६ एप्रिल- बोहाग बिहू (Bohag Bihu)
- १८ एप्रिल-गुड फ्रायडे
- २१ एप्रिल- गरिया पूजा ( Garia Puja)
- २९ एप्रिल- भगवान श्री परशुराम जयंती
- ३० एप्रिल- बसव जयंती/अक्षय तृतीया