Bank Holiday March 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

३१ मार्च रोजी सरकारचे आर्थिक वर्ष संपते. म्हणजेच सरकारी महसूल, देयके आणि सेटलमेंटशी संबंधित सर्व व्यवहार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करणे आवश्यक असतं.

३१ मार्च २०२५ रोजी कोणत्या बँकिंग सुविधा सुरू असणार?

  • प्राप्तिकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कासह सरकारी कर देयके.
  • पेन्शन पेमेंट आणि सरकारी अनुदाने
  • सरकारी वेतन आणि भत्त्यांचे वितरण
  • सरकारी योजना आणि अनुदानांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार

या शहरांमध्ये बँका राहणार सुरू

शहरे/तारीख१४ मार्च (होळी)१५ मार्च२२ मार्च (चौथा शनिवार)३० मार्च (गुढीपाडवा)३१ मार्च (ईद)
मुंबई सुट्टीकार्यरतसुट्टीसुट्टीसुट्टी रद्द
नागपूरसुट्टीकार्यरतसुट्टीसुट्टीसुट्टी रद्द
नवी दिल्लीसुट्टीकार्यरतसुट्टीसुट्टीसुट्टी रद्द
पणजी सुट्टीकार्यरतसुट्टीसुट्टीसुट्टी रद्द

१ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी

१ एप्रिल (मंगळवार) रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बुहतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.