रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडचे ​​संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी बरखास्त केले आहे. परिणामी मध्यंतरीच्या काळात बँकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक” म्हणून नियुक्ती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरबीआयने प्रशासकाला त्याच्या कर्तव्याचे पालन करण्यास मदत करण्यासाठी “सल्लागारांची समिती” देखील नियुक्त केली आहे. “सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये व्यंकटेश हेगडे (माजी महाव्यवस्थापक, SBI), महेंद्र छाजेड (चार्टर्ड अकाउंटंट) आणि सुहास गोखले (माजी एमडी, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड) यांचा समावेश आहे,” असंही RBI ने एका निवेदनात म्हटले आहे.

सामान्य बँकिंग कामे सुरू राहणार

अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड विरुद्ध कारवाई करणे आवश्यक होते, कारण बँकेत आढळलेल्या “खराब प्रशासन मानकांमुळे उद्भवलेल्या काही भौतिक समस्यां”चा सामना करण्यासाठी RBI द्वारे कोणतेही व्यावसायिक निर्बंध लादले गेलेले नाहीत आणि प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली बँक आपले सामान्य बँकिंग हालचाली सुरू ठेवेल. त्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi dismisses board of directors of abhyudaya sahakari bank for 12 months impact on customers vrd
Show comments