मुंबई: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची उपकंपनी असलेल्या ‘जिओ पेमेंट सोल्युशन्स’ला (जेपीएसएल) रिझर्व्ह बँकेकडून ऑनलाइन पेमेंट ॲग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी येत्या २८ ऑक्टोबरपासून परवाना मिळाल्याचे कंपनीने मंगळवारी प्रमुख बाजारमंचांना कळविले.

विद्यमान वर्षात रिझर्व्ह बँकेने पेटीएमचे आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया करणाऱ्या पेटीएम पेमेंट्स बँकेला वॉलेट आणि तत्सम सेवांच्या व्यवहारास प्रतिबंध करणारा आदेश दिला होता. आता याचा फायदा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला मिळण्याची शक्यता आहे. जिओ फायनान्शियलला यातून डिजिटल वित्तीय सेवा बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण हिस्सा मिळवण्याची संधी आहे. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या समभागांवर त्याचे सकारात्मक पडसाद उमटले आणि ‘बीएसई’वर समभाग तीन टक्क्यांनी वधारून ३२६.१५ रुपयांवर बंद झाला.

हेही वाचा :अदानी एंटरप्रायझेसचा नफा आठ पटींनी वाढून १,७४१ कोटींवर

u

जिओ पेमेंट्स बँक ही देखील जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा भाग आहे, सध्या बायोमेट्रिक ॲक्सेस आणि फिजिकल डेबिट कार्डसह डिजिटल बचत खात्यांची सेवा तिच्याकडून पुरवली जाते. यामध्ये सुमारे १५ लाख सक्रिय वापरकर्त्यांना समावेश आहे. या आधारावर विस्तार करून, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने जिओ पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून बँकिंग सेवांचा विस्तार करण्याची योजना आखली आहे.

हेही वाचा :रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात १०२ टनांची भर

गेल्या आठवड्यात, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, त्यात निव्वळ नफा ३.१२ टक्क्यांनी वाढून तो सप्टेंबर अखेर ६८९.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर सरलेल्या तिमाहीत एकूण उत्पन्न १४.१४ टक्क्यांनी वाढून ६९४ कोटी रुपये झाले आहे.

Story img Loader