मुंबई : तुमच्या ग्राहकांना जाणून घेण्याच्या अर्थात ‘केवायसी’चे नियम आणि संलग्न काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँकेवर ५.३९ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी स्पष्ट केले. मध्यवर्ती बँकेने ‘पेमेंट बँकेच्या परवान्यासंबंधाने मार्गदर्शक तत्त्वे’, ‘बँकेची सायबर सुरक्षाविषयक रूपरेषा’ आणि ‘यूपीआय परिसंस्थेसह मोबाइल बँकिंग ॲपची सुरक्षितता’ या आघाडीवरील काही तरतुदींचेही पेटीएम पेमेंट्स बँकेने पालन केले नसल्याचे आढळल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा… ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे आज वितरण
दरम्यान, मध्यवर्ती बँकेने गुरुवारी केलेल्या कारवाईत, विशिष्ट नियामक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पुणे येथील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेला ४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.