मुंबई : रिझर्व्ह बँकेने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा १.६६ लाख रुपयांवरून २ लाख रुपये केली आहे. शेतीसंबंधित वाढते खर्च आणि एकंदर महागाईचा वाढता पारा लक्षात घेऊन, शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला. यामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्धता वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> परदेशी चलनांतील ठेवींवरील व्याजदर मर्यादेत वाढ; ढासळत्या रुपयाला सावरण्यासाठी पाऊल

आघाडीच्या बँकांना तारणमुक्त कर्जाच्या योजनेसंबंधित सूचना लवकरच देण्यात येईल, असे मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते. वर्ष २०१९ मध्ये तारण मुक्त कृषी कर्जाची मर्यादा मध्यवर्ती बँकेने १ लाख रुपयांवरून १.६ लाख रुपयांपर्यंत वाढवली होती. केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाने, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आर्थिक संकट लक्षात घेता ३ लाख रुपयांपर्यतच्या पीक कर्जासाठी प्रक्रिया, दस्तऐवज, तपासणी आणि खातेवही शुल्क आणि इतर सर्व सेवा शुल्क देखील माफ केले आहे.