मुंबई: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक सोमवारपासून सुरू झाली. व्याजदरात कोणताही बदल न होणारी ही सलग १० वी बैठक असेल, असा जवळपास सर्वच तज्ज्ञांचा होरा आहे. विशेषतः जागतिक वस्तू दर पाहून व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाईल, असा अंदाज येस बँकेच्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक पातळीवर वस्तूंचे दर वाढण्याची भीती असून, त्यातून अमेरिकेत महागाई वाढण्याचा धोका आहे. विशेषत: आयात करविषयक धोरणाबाबतची चिंता आणि जागतिक पुरवठा साखळीवरील त्यांचा परिणाम या बाबींचा प्रभाव रिझर्व्ह बँकेच्या व्याजदराबाबतच्या भूमिकेवर पडेल, असा येस बँकेच्या अहवालाचा कयास आहे. रिझर्व्ह बँक कोणताही निर्णय घेण्याआधी जागतिक आणि देशांतर्गत घटकांचा काळजीपूर्वक विचार करेल. त्यानंतर व्याजदर कपातीचा निर्णय पुढील काही महिन्यांत घेतला जाऊ शकतो.

हेही वाचा : Gold Silver Price : दसरा, दिवाळीपूर्वी सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरात आज काय आहेत नवे दर?

रिझर्व्ह बँकेककडून आगामी काळात व्याजदर कपातीचे चक्र सुरू होण्याची शक्यता आहे. सुरूवातीला अर्धा ते पाऊण टक्का कपातीचे पाऊल उचलले जाईल. व्याजदरात कपात करताना रिझर्व्ह बँकेची भूमिका सावधगिरीची असेल. यामुळे एकदम मोठी कपात टाळली जाईल. व्याजदरात ठराविक कालावधीनंतर छोटी कपात करण्यात येईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :Gold Silver Rate Today : नवरात्रोत्सवादरम्यान सोने चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

हवामानविषयक धोक्यांवर लक्ष

लांबलेला मोसमी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन खाद्यान्नांची महागाई वाढण्याचा धोका आहे. यामुळे रिझर्व्ह बँक हवामानविषयक धोक्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. खाद्यान्न महागाई आणि त्यात होणारी टिकाऊ घट यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यामुळे व्याजदर कपातीसाठी डिसेंबरमधील पतधोरण बैठक महत्वाची ठरेल, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi monetary policy meeting rbi likely to keep rates steady print eco news css