भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI ने उत्तर प्रदेशातील युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. ही यूपीची सहकारी बँक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

RBI ने हा निर्णय का घेतला?

भारतीय रिझर्व्ह बँकेने बिजनोर येथील युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बँकेने सहकार आयुक्त व निबंधकांना हे आदेश दिले आहेत. याबरोबरच यासाठी आरबीआयकडून लिक्विडेटरचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचाः सेन्सेक्स ६७ हजारांवर असूनही २०२२ च्या तुलनेत फायदा मूल्य कमीच?

बँकेत कोणतेही काम होणार नाही

उद्यापासून म्हणजेच १९ जुलै २०२३ पासून युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत कोणतेही काम होणार नाही. तो व्यवसायासाठी बंद आहे. आता या बँकेत ना पैसे जमा केले जाणार आहेत, ना पैसे काढले जाणार आहेत. बँकिंग नियमन कायद्यानुसार, युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड २२(३) (ए), २२(३) बी, २२ (३) सी, २२ (३) (डी) आणि २२ (३ ई) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे. यामुळे मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचाः विश्लेषणः पूर अन् पावसात कारचं नुकसान झालंय, मग तुम्ही कोणत्या प्रकारचा विमा निवडणार?

ग्राहक किती पैसे काढू शकतो?

या बँकेच्या ग्राहकांसाठी ही बँक ठेवीदार आणि ग्राहकांच्या हितासाठी योग्य नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे बँक ग्राहकाला पूर्ण रक्कम देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत बँकेचे ग्राहक ठेवीदार नियमांनुसार डिपॉझिट आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DIGCS) मधून ५,००,००० रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi now cancels license of united india co operative bank limited bank customers can withdraw only rs 5 lakh vrd