नवी दिल्ली : आयआयएफएल फायनान्स लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स लिमिटेड (जेएमएफपीएल) या बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू असून, आता त्यांचे विशेष लेखापरीक्षण केले जाणार आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
रिझर्व्ह बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला या दोन्ही कंपन्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निर्बंध लादले होते. आता रिझर्व्ह बँकेने या कंपन्यांच्या विशेष लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या न्यायवैद्यक लेखापरीक्षकांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल. यासाठी निविदा सादर करण्याची मुदत ८ एप्रिल आहे. या निविदांचे वितरण १२ एप्रिलला होणार आहे.
रिझर्व्ह बँकेने आयआयएफएल फायनान्सला सोने कर्जाची मंजुरी आणि वितरण करण्यास मनाई केली आहे. सोने कर्ज वितरणात काही अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच, जेएमएफपीएलने नियमांचे उल्लंघन करीत ठराविक ग्राहकांना विविध प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी कर्जरूपाने निधी दिल्याचे समोर आले होते. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने या कंपनीला आयपीओसह समभागांवर कर्ज देण्यास मनाई केली आहे.