RBI Action on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते आणि बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करते. गुरुवारी १८ जानेवारी २०२४ रोजी सेंट्रल बँकेने पाच सहकारी बँकांवर कारवाई करून लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली, त्यात एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरिक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरिक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.

NKGSB ने सहकारी बँकेला ५० लाखांचा दंड ठोठावला

रिझर्व्ह बँकेने NKGSB सहकारी बँकेला ५० लाख रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही. तसेच ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली गेली होती. तपासणीनंतर RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधानी न झाल्यामुळे RBI ने NKGSB सहकारी बँकेला ५० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

milind kale appointed as chairman of the board of management of cosmos bank
कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद काळे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Chandrapur District Bank recruitment case interviews due to fear of administrator appointment
प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखती, चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण
Compensation , Railways , Prajakta Gupte, Kalyan,
रेल्वे अपघातात मरण पावलेल्या कल्याणच्या प्राजक्ता गुप्तेना रेल्वेकडून आठ लाखाची भरपाई
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Ravi Raja provided list of 30 big property tax defaulters to Municipal Commissioner
मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधीचा मालमत्ता कर थकीत, एमएसआरडीसीने थकवला मालमत्ता कर
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
RBI rate cut delay will lead to more growth sacrifice
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीस विलंब केल्यास विकासवेग मंदावेल; फेब्रुवारीमध्ये पाव टक्का कपात अपेक्षित 

हेही वाचाः Amazon Layoffs : कंपन्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार कायम; अ‍ॅमेझॉन प्राइम युनिटमधील ५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

‘या’ कारणास्तव इतर बँकांना दंड ठोठावण्यात आला

रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने दान केलेल्या पैशात नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली. आरबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम नीट पाळले नाहीत. याशिवाय कर्ज आणि अॅडव्हान्स देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने गुजरातमधील मेहसाणा सहकारी बँकेला ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि पाटडी नागरिक सहकारी बँक लिमिटेड आणि मेहसाणा नागरिक सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: बोईंगला पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ची भुरळ, भारतात १६०० कोटींची गुंतवणूक करणार

आरबीआयच्या कारवाईचा ग्राहकांवर किती परिणाम होणार?

या पाच बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. हा दंड बँकांच्या कामकाजाशी संबंधित कामांवर लावण्यात आला असून, त्याचा त्यांच्या सेवेवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. बँकांचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे.

Story img Loader