RBI Penalty: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १२ जानेवारी रोजी ESAF स्मॉल फायनान्स बँक, धनलक्ष्मी बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांच्यावर नियमांचे पालन न केल्याबद्दल कारवाई केलीय. त्यांच्याविरुद्ध एकूण २.४९ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोणत्या बँकेकडून किती दंड?
रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड सिंध बँकेवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका कंपनीला नियमाविरुद्ध कर्ज दिल्याबद्दल आरबीआयने पंजाब अँड सिंध बँकेवर ही कारवाई केली आहे. मध्यवर्ती बँकेने धनलक्ष्मी बँकेला १.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. वैधानिक आणि इतर निर्बंधांसह KYC आणि कर्ज, अॅडव्हान्सवरील व्याजदरांशी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल धनलक्ष्मी बँकेला १.२० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचाः व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये २६.३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, ३ दिवसांत ४० हजारांहून अधिक करार
बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ४६(४)(i) सह वाचलेल्या कलम ४७A(१)(C) च्या तरतुदींनुसार RBI ला दिलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचाः आता टाटा समूह थेट नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर, ‘ही’ कंपनी खरेदी करणार
तसेच ESAF स्मॉल फायनान्स बँकेवर २९.५५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. सेंट्रल बँकेने ESAF स्मॉल फायनान्स बँकेला ‘बँकांमधील ग्राहक सेवा’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला. RBI ने म्हटले आहे की, या बँकांवरील कारवाई नियामक अनुपालनातील त्रुटींच्या आधारे करण्यात आली आहे आणि बँकेने आपल्या ग्राहकांबरोबर केलेल्या कोणत्याही व्यवहार किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम करण्याचा हेतू नव्हता.