RBI Imposes Penalty on Axis Bank : देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने अ‍ॅक्सिस बँकेवर ९०.९२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय बँकेने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आरबीआयने केलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे अ‍ॅक्सिस बँकेवर ही कारवाई करण्यात आल्याचे केंद्रीय बँकेने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ कारणास्तव अ‍ॅक्सिस बँकेवर कारवाई करण्यात आली

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने नो युवर कस्टमर (KYC) च्या नियमांचे पालन न केल्यामुळे अ‍ॅक्सिस बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. काही ग्राहकांची ओळख आणि पत्त्याच्या तपशिलांशी संबंधित नोंदी ठेवण्यात बँक अपयशी ठरली आहे. यानंतर केवायसीशी संबंधित २०१६ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने बँकेला ९०.९२ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

हेही वाचाः सेवानिवृत्ती नियोजनासाठी भारतीय सज्ज; तीन वर्षांत प्रमाण ४९ टक्क्यांवरून थेट ६७ टक्क्यांपर्यंत वाढले

वसुली एजंट योग्य पद्धतीने वागत नव्हते

याशिवाय अ‍ॅक्सिस बँकेचे काही रिकव्हरी एजंट ग्राहकांकडून घेतलेल्या कर्जाची वसुली करताना योग्य वर्तन करत नसल्याचेही रिझर्व्ह बँकेला आढळून आले आहे. यानंतर आरबीआयने बँकेला नोटीस बजावली आहे. त्यावर बँकेनेही उत्तर दिले, मात्र त्यावर रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले नाही आणि त्यानंतर बँकेवर दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचाः IMPS मधील तांत्रिक बिघाडानंतरही UCO बँकेने ६४९ कोटी रुपये केले वसूल, १७१ कोटी अजूनही अडकलेत

मणप्पुरम फायनान्सला दंड ठोठावला

अ‍ॅक्सिस बँकेशिवाय आरबीआयने मणप्पुरम फायनान्सवरदेखील कारवाई केली आहे आणि एकूण ४२.७८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी सिस्टेमॅटकली महत्त्वाची नॉन-डिपॉझिट टेकिंग कंपनी आणि डिपॉझिट टेकिंग कंपनी २०१६ च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या फायनान्स कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi took a big action on axis bank and imposed a fine of 90 lakhs what is the exact reason vrd
Show comments