२०३० सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था तर वाढेलच, पण भारतीय मालमत्ता बाजारातही बंपर वाढ दिसून येणार आहे. २०३० वर्षांपर्यंत भारतीय मालमत्ता बाजार १ ट्रिलियन डॉलर्स एवढा वाढेल, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे येत्या काही वर्षांत देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी मार्केटमध्ये प्रचंड तेजी येणार असून, रोजगार वाढणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

CNBC-TV18 च्या अहवालानुसार, २०२१ मध्ये भारतीय मालमत्ता बाजार २०० अब्ज डॉलरचा होता, परंतु २०३० पर्यंत तो १ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढू शकतो. विशेष म्हणजे काळानुरूप केवळ प्रॉपर्टी मार्केटच वाढणार नाही, तर देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याची भूमिकाही वाढणार आहे.

हेही वाचाः BYJU मधून ४०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; कामगिरी मूल्यांकनाच्या नावाखाली चालवली नोकरीवर कु-हाड

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय

रिअल इस्टेट ब्रोकर रवी केवलरामानी सांगतात की, देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच दरवर्षी लाखो लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे जात आहेत. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला राहण्यासाठी घराचीही गरज भासणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी मार्केटमध्ये तेजी येणार आहे. विशेषत: मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये मालमत्ता व्यवसाय वेगाने वाढेल. लोकांना राहण्यासाठी उंच इमारती बांधाव्या लागतील.

हेही वाचाः टाटांची टायटन आता ‘या’ कंपनीतील २७ टक्के भागभांडवल ४६०० कोटींना विकत घेणार, अधिग्रहण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा

२ बेडरूमच्या अपार्टमेंटची किंमत दीड कोटी रुपयांवर

ते म्हणतात की, कोरोनाच्या काळात मंदीतून जात असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आता वेग आला आहे. लोक पूर्वीपेक्षा महागडे फ्लॅट खरेदी करत आहेत. मुंबईत एका बेडरूमच्या अपार्टमेंटसाठी लोक ८० ते ९० लाख रुपये सहज खर्च करत असल्याचं ते सांगतात. तर दोन बेडरूमच्या अपार्टमेंटची किंमत दीड कोटी रुपयांवर गेली आहे. त्यासाठी खरेदीदारांचीही ओढ लागली आहे. केवलरामानी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील बोरिवली, कांदिवली आणि दहिसर यांसारख्या भागात अपार्टमेंट फ्लॅटची मागणी वाढली आहे. त्यामुळे भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासाच्या शक्यता वेगाने वाढत असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

रवी केवलरामानी यांचे १ दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स

रवी केवलरामानी हे मुंबईतील प्रसिद्ध प्रॉपर्टी बिझनेसमन आहेत. आर के मुंबई रिलेटर्स असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीला रिअल इस्टेटमध्ये काम करण्याचा ३५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते सोशल मीडियाद्वारे सामान्य लोकांना रिअल इस्टेटशी संबंधित माहितीदेखील देतात. त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real estate business to reach 1 trillion dollar by 2030 cities including mumbai will have the highest demand for flats vrd