संपूर्ण देश नवीन वर्ष साजरा करीत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने देशातील लोकांनी मनसोक्त बिर्याणी खाल्ली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मशी संबंधित सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्री स्विगीवर ४.८ लाखांहून अधिक बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्या होत्या. प्रत्येक मिनिटाला १,२४४ युनिट्स डिशच्या ऑर्डर देण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये दर चारपैकी एक बिर्याणीची ऑर्डर दिली जात होती. म्हणजेच हैदराबादमध्ये फक्त १ लाख २० हजारांहून अधिक बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या गेल्या.
हेही वाचाः Money Mantra : तुमच्या नावे इतर कोणी कर्ज घेतले आहे का? आता काही मिनिटांतच समजणार
खरं तर स्विगी इन्स्टामार्ट (किराणा सामान आणि घरगुती आवश्यक वस्तू ऑर्डर करण्यासाठी प्लॅटफॉर्म)वरदेखील बंपर ऑर्डर मिळाल्या. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी क्रिकेट विश्वचषक फायनलदरम्यान मिळालेल्या ऑर्डरच्या तुलनेत नवीन वर्षात प्रति मिनिट १.६ पट अधिक ऑर्डर देण्यात आल्या. संध्याकाळपर्यंत स्विगीच्या फूड डिलिव्हरी आणि इंस्टामार्ट सेवांनी गेल्या वर्षीचा उच्चांक ओलांडला. स्विगीने गेल्या वर्षी याच कालावधीत देशभरात ३.५० लाख बिर्याणी ऑर्डर आणि २.५ लाख पिझ्झा वितरित केले होते. स्विगीचे फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर म्हणाले, “स्विगी फूड आणि इंस्टामार्टने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्व विक्रम मोडले, कंपनीसाठी याहून जास्त आनंद तो काय?”
हेही वाचाः LIC GST Notice : LIC ला मोठा झटका, ८०६ कोटींची GST नोटीस मिळाली, कंपनीवर काय परिणाम होणार?
स्विगी अॅपने रविवारी रात्री ९.५० वाजता ‘X’ वर एका पोस्टमध्ये सांगितले की, “गेल्या तासाभरात सुमारे दहा लाख युजर्स स्विगी अॅपवर सक्रिय होते.” कालपासून आलेल्या ग्राहकांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे.” यंदा दहा लाखांहून अधिक लोकांनी इतरांसाठी जेवण ऑर्डर केले, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
दिल्लीकर मोठ्या प्रमाणावर दारू प्यायले
नवीन वर्षात दिल्लीत २४ लाख इंग्रजी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली. ३१ डिसेंबर रोजी २४ लाख ७२४ बाटल्यांची विक्री झाली. तर एक दिवस अगोदर ३० डिसेंबर रोजी १७ लाख ७९ हजार ३७९ बाटल्यांची विक्री झाली होती. हा आकडा गेल्या वर्षी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ च्या तुलनेत सुमारे चार लाख अधिक आहे. डिसेंबर महिन्यातच दिल्लीत सुमारे पाच कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली.