पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एप्रिल महिन्यात प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत विक्रमी वाढ झाल्याचे वाहन निर्मात्यांची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)’ने मंगळवारी दिली.

सियामने दिलेल्या आकडेवारीनुसार, वाहन निर्मात्यांकडून सरलेल्या एप्रिल महिन्यात ३,३५,६२९ वाहने वितरकांकडे पोहोचवण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात (एप्रिल २०२३) ३,३१,२७८ वाहने वितरकांकडे धाडण्यात आली होती. युटिलिटी अर्थात विविध कार्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या लहान वाणिज्य वापराच्या विक्रीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात त्यात २१ टक्के वाढ होत १,७९,३२९ वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात १,४८,००५ वाहनांची विक्री झाली होती. एप्रिल २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या १,२५,७५८ वाहनांच्या तुलनेत प्रवासी वाहनांची विक्री मात्र २३ टक्क्यांनी घटून ९६,३५७ वाहनापर्यंत खाली घसरली. व्हॅनची विक्री गेल्या महिन्यात १५ टक्क्यांनी वाढून १२,०६० वाहनांवर पोहोचली, जी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १०,५०८ वाहने होती.

हेही वाचा – सीमेन्समधून सीमेन्स एनर्जी लिमिटेड वेगळी होणार

दुचाकींची घाऊक विक्री गेल्या महिन्यात ३१ टक्क्यांनी वाढून १७,५१,३९३ वाहनांवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १३,३८,५८८ नोंदवली गेली होती. तर तीन चाकी वाहनांच्या विक्रीत देखील १४.५ टक्क्यांची वाढ होत ती ४९,११६ वर पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी ४२,८८५ तीन चाकी वाहनांवर मर्यादित होती.

हेही वाचा – सरकारी बँकांचा एकूण नफा १.४० लाख कोटींपुढे

सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले की, विद्यमान आर्थिक वर्ष वाहन उद्योगासाठी आतापर्यंत सकारात्मक ठरले आहे, कारण एप्रिल २०२३ च्या तुलनेत एप्रिल २०२४ मध्ये सर्व वाहन श्रेणीतील विक्रीमध्ये वाढ झाली आहे. सकारात्मक ग्राहक भावना आणि सणोत्सवाच्या काळातील जोरदार मागणीमुळे वाहनांची विक्री वाढली आहे. समाधानकारक मान्सूनचा अंदाज, निवडणुकीनंतरचे धोरणात्मक सातत्य, उत्पादन आणि पायाभूत सुविधांवर सरकारचा जोर यामुळे एकूणच आर्थिक विकासाला चालना मिळेल, ज्यामुळे वाहन क्षेत्राच्या वाढीचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record sales of vehicles in april print eco news ssb
Show comments