Commercial LPG Cylinder Price Today 1 June 2023 : गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठा दिलासा देण्यात आला असून, सिलिंडरच्या वाढत्या किमती तेल कंपन्यांनी कमी केल्यात. मात्र, हा दिलासा सर्वसामान्यांना नसून छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना देण्यात आला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी जून महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८३.५० रुपयांची कपात केली आहे. ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर १ जूनपासून लागू झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त झाला असून, तो १७७३ रुपयांवर आला आहे. दुसरीकडे १ मे २०२३ रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये होती आणि आजही ती तशी आहे. १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता दिल्लीत १७७३ रुपयांना स्वस्त दरात विकला जात आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduction in gas cylinder rates lpg cheaper by 83 rupees 1 st june 2023 know new rates vrd
Show comments