नवीन भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे, त्याला रोखणे अशक्य आहे. G 20 चे भारतानं भूषवलेले अध्यक्षपद ऐतिहासिक आहे, असं रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी म्हणालेत. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे(AGM)त बोलत होते.

मुकेश अंबानी म्हणाले की, १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे हा भारत थांबत नाही, खचून जात नाही, दमत नाही. या भारताला थांबवता येणार नाही. चांद्रयान ३ चे यशही आपल्याला तेच सांगते. भविष्यात भारत काय साध्य करू शकतो, याच्या शक्यता अमर्याद आहेत. आम्ही गेल्या १० वर्षांत १५० अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे. प्रकल्प कितीही मोठे किंवा गुंतागुंतीचे असले तरी आम्ही ते जागतिक मानकांनुसार परवडणाऱ्या किमतीत वेळेआधी पूर्ण केले आहेत. २०४७ पर्यंत आपण भारताला विकसित समृद्ध भारत बनवू शकतो, यासाठी व्यापारी समुदायाने एकत्र काम करण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी सांगितले.

40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…

हेही वाचाः गणेश चतुर्थीला जिओ एअर फायबर लाँच करणार; मुकेश अंबानींची घोषणा

रिलायन्सचा महसूल ९.७४ लाख कोटी इतका आहे. निव्वळ नफा ७३ हजार कोटी झाला आहे. ३.४ लाख कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. आम्ही तिजोरीत कर म्हणून १,७७,१७३ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. २.६ लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. आमचे कर्मचारी ३.९ लाखांच्या घरात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिलीय.

हेही वाचाः मुकेश अंबानींनी सोपवली नव्या पिढीच्या हाती कमान, आकाश-ईशाकडे RIL बोर्डात मोठी जबाबदारी, नीता अंबानी बाहेर

Jio AI क्षेत्रात काम करणार – मुकेश अंबानी

जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या ४५ कोटींच्या पुढे आहे. भारतात सर्वात वेगवान 5G रोलआउट झाले आहे. सरासरी युजर्स दर महिन्याला २५ जीबी डेटा वापरतो. मुकेश अंबानी म्हणाले की, जिओची कमाई आतापर्यंतच्या उच्च पातळीवर आहे. Jio चा डेटा ट्रॅफिक दरमहा ११०० कोटी जीबी आहे. मुकेश अंबानी यांनी ४६ व्या एजीएममध्ये सांगितले की, Jio 5G अवघ्या नऊ महिन्यांत देशातील ९६ टक्के शहरांमध्ये पसरला आहे. डिसेंबरपर्यंत 5G सेवा संपूर्ण भारतात पोहोचेल. देशातील एकूण 5G सेवेमध्ये Jio चा ८५ टक्के नेटवर्क हिस्सा आहे. दर १० सेकंदाला एक 5G ग्राहक जोडला जात असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. तसेच Jio AI क्षेत्रात काम करणार आहे.आम्ही एआय इनोव्हेशनसाठी क्षमता असलेला टॅलेंट पूल तयार करीत आहोत. आम्हाला AI चे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे लागणार आहे. आम्ही २००० मेगावॅट एआय क्षमता निर्माण करणार आहोत. मला देशाला एक वचन द्यायचे आहे. सात वर्षांपूर्वी आम्ही जिओ कनेक्टिव्हिटीचे वचन दिले होते. आता मला वचन द्यायचे आहे की, Jio AI सर्वांना सर्वत्र उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Story img Loader