भारत आता स्टार्टअपच्या बाबतीत जगात तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. दरवर्षी हजारो स्टार्टअप्स उघडत आहेत. अहवालानुसार, देशात ९०,००० स्टार्टअप्स आणि १०७ युनिकॉर्न कंपन्या आहेत, ज्यांची एकूण संपत्ती ३० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. स्टार्टअप कंपन्या आणि उद्योजकांना अधिक लाभ मिळावा, यासाठी नरेंद्र मोदी सरकार देशात अशी अनेक धोरणे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारने देशात स्टार्टअप नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. नवीन उद्योजकांसाठी स्टार्टअप नोंदणी आता खूप सोपी झाली आहे. तुम्ही तुमच्या स्टार्टअपची नोंदणी फक्त ५ सोप्या टप्प्यांद्वारे करू शकता. या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमचा व्यवसाय समाविष्ट करणे आवश्यक

भारतात कोणताही स्टार्टअप सुरू करण्यासाठी इन्कॉर्पोरेशनची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही नियमन प्रक्रिया खासगी मर्यादित कंपनी किंवा भागीदारी फर्म म्हणून समाविष्ट करणे आवश्यक आहे. कंपनीच्या समावेशासाठी अर्ज रजिस्ट्रार ऑफ कंपनीज फर्मकडे केला जातो. त्यासाठी कागदपत्रे आणि शुल्क भरावे लागेल. यानंतर तुमचा व्यवसाय अंतर्भूत होईल.

स्टार्टअप इंडियामध्ये नोंदणी करा

व्यवसायाचा समावेश केल्यानंतर तुम्हाला स्टार्टअप इंडियाच्या वेबसाइटला भेट देऊन तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. यासाठी त्याच्या अधिकृत वेबसाइट startupindia.gov.in वर क्लिक करा. यानंतर येथे तुम्हाला रजिस्टर पर्याय निवडावा लागेल आणि सर्व तपशील भरून खाते तयार करावे लागेल. तुम्ही तुमची कंपनी येथे नोंदणी करा.

DPIIT मान्यता मिळवा

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड तुमच्या कंपनीला पर्यावरण कायदे, कर सवलत इत्यादी विविध विभागांकडून मंजुरी आणि सूट मिळविण्यात मदत करते. अशा परिस्थितीत कोणताही स्टार्टअप सुरू करण्यासाठी डीपीआयआयटीकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. DPIIT ओळख मिळवण्यासाठी तुम्हाला स्टार्टअप इंडियाच्या वेबसाइटवरच ‘DPIIT Recognition for Startups’ पर्याय निवडावा लागेल. यानंतर येथे ‘Schemes and Policies’ हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर येथे एक अर्ज उघडेल, जो भरून नंतर फॉर्म सबमिट करा

ओळख अर्जपत्र भरा

तुमच्या स्टार्टअपची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ओळख फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला कार्यालयाचा पत्ता, अधिकृत प्रतिनिधी तपशील, भागीदार/संचालक तपशील इत्यादी भरावे लागतील. यानंतर शेवटी तुम्ही अटी आणि शर्थी स्वीकारता, यानंतर फॉर्म भरा.

तुमच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रतीक्षा करा

यानंतर सर्व तपशील तुमच्याकडून क्रॉस व्हेरिफाय केले जातील. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Register before starting a startup follow these five easy steps vrd