Flipkart Success Story : फ्लिपकार्ट ही देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आणि वेबसाइट्सपैकी एक आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून कपड्यांपर्यंत सर्व काही एका क्लिकवर येथे उपलब्ध आहे. परंतु फ्लिपकार्ट कंपनी स्थापन करणारे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांच्या यशोगाथेबद्दल अनेकांना माहिती नाही. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे दोघे फ्लिपकार्टचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोघेही आयआयटी दिल्लीच्या २००५ च्या बॅच विद्यार्थी होते.
जेव्हा सचिन आणि बिन्नी बन्सल आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण झाले, तेव्हा त्यांनी ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचा विचार केला. त्यांचे लक्ष्य तेव्हा ५० दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे होते. अनेकांना सचिन आणि बिन्नी भाऊ वाटतात, पण तसे नाही. अर्थात त्यांचे आडनाव एकच आहे.
गुगलनं नाकारल्यानं व्यवसायाला सुरुवात
गुगलने बिन्नी बन्सल यांना दोनदा नोकरी देण्याचे नाकारल्यानंतर याची सुरुवात झाली. फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून पहिल्यांदा झाली. बिन्नी आणि सचिन यांनी एकूण २,७१,००० रुपये जमा करून निधी तयार केला. अशा प्रकारे फ्लिपकार्टची स्थापना केली. गंमत म्हणजे अॅमेझॉनचीही अशीच सुरुवात झाली आणि नंतर या प्लॅटफॉर्मवर सर्व काही विकायला सुरुवात झाली. फ्लिपकार्टने ऑनलाइन बुकस्टोअर म्हणूनही सुरुवात केली आणि भारतातील अॅमेझॉनची स्पर्धक बनली.
हेही वाचाः Real Estate vs Mutual Funds : रिअल इस्टेट की म्युच्युअल फंड, गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय कोणता?
फ्लिपकार्ट पहिल्यांदा २००७ मध्ये बंगळुरूमध्ये एका छोट्या टू बीएचके फ्लॅटमध्ये सुरू करण्यात आली होती. सचिनने फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून काम सुरू केले, तर बिन्नीने वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटचे सीओओ पद स्वीकारले. २०१२ मध्ये १५० दशलक्ष डॉलर उभारल्यानंतर फ्लिपकार्ट लवकरच भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी बनली. वॉलमार्टने कंपनीचे ७७ टक्क्यांहून अधिक शेअर्स ताब्यात घेतल्यानंतर बिन्नी आणि सचिन या दोघांनीही कंपनी सोडली.
हेही वाचाः आधार आणि पॅन तात्काळ करा लिंक अन्यथा आयटीआर परतावा मिळणार नाही, टीडीएसवरही परिणाम होणार
सर्वात मोठा करार
वॉलमार्टने १६ अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक करारात फ्लिपकार्टचे ७७ टक्के शेअर्स खरेदी केले. इंटरनेट फर्मशी संबंधित हा सर्वात मोठा सौदा ठरला. कॅश आऊट करून कंपनी सोडली तरीही सचिन आणि बिन्नी बन्सल अजूनही अब्जाधीश आहेत. सचिन बन्सल यांची एकूण मालमत्ता १.३ अब्ज डॉलर आहे, जी भारतीय चलनात १०,६४८ कोटी रुपये आहे. बिन्नी बन्सल यांची एकूण संपत्ती ११,४६७ कोटी रुपये आहे.