Rekha Jhunjhunwala Company Property Deal: दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची कंपनी Kinnteisto LLP ने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि चांदिवली परिसरात ७४० कोटी रुपयांना दोन ऑफिससाठी जागा खरेदी केल्या आहेत. ही दोन्ही कार्यालये एकूण १.९४ लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेली आहेत.
अलीकडच्या काळात भारतातील हा सर्वात मोठा व्यावसायिक सौदा आहे. रिअल इस्टेट डेटा प्लॅटफॉर्म प्रॉपस्टॅकच्या माहितीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्या कंपनीने वांद्रे-कुर्ला संकुला (BKC) मध्ये सुमारे ६०१ कोटी रुपयांची १.२६ लाख चौरस फूट मालमत्ता खरेदी केली आहे. या मालमत्तेमध्ये १२४ पेक्षा जास्त पार्किंग स्लॉट आहेत आणि ते वाधवा ग्रुप होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने विकले आहेत.
हेही वाचाः बजाज फिनसर्व्ह आणि स्माईल ट्रेन इंडिया ‘महा स्माइल्स’ उपक्रम राबवणार
F
M
चांदिवलीमध्ये १३८ कोटी रुपयांचा मालमत्तेचा व्यवहार
चांदिवली परिसरातील कार्यालयाची जागा कनाकिया स्पेस रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आली आहे. ही मालमत्ता ६८,१९५ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चांदिवली येथील मालमत्तेचा सौदा १३७.९९ कोटी रुपयांना झाला आहे. या मालमत्तेत एकाच वेळी ११० कार पार्क करण्याची सुविधा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्या कंपनीने दोन्ही प्रॉपर्टी डील ऑक्टोबर २०२३ मध्ये केल्या आहेत.
हेही वाचाः अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात; दिग्गज ई-कॉमर्स कंपनी आता ‘या’ विभागातील अनेकांना घरी बसवणार
रेखा झुनझुनवाला यांनी डीलवर ही माहिती दिली
मनी कंट्रोलने या मेगा प्रॉपर्टी डीलबद्दल विचारले असता रेखा झुनझुनवाला यांनी सांगितले की, या दोन्ही ऑफिस स्पेस कुटुंबासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने खरेदी केल्या आहेत. Kinnteisto LLP ही राकेश झुनझुनवाला यांची कंपनी आहे, ज्यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल म्हटले जात होते. राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये निधन झाले.