लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: दिवाळखोरी कार्यवाहीनुसार रिलायन्स कॅपिटलवरील मालकीसाठी हिंदुजा समूहातील इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जच्या दाव्यावरील मंजुरी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) सोमवारी रिझर्व्ह बँक आणि औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाला (डीआयपीपी) दिले.

रिलायन्स कॅपिटलच्या दिवाळखोरी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली मंजुरी आयआयएचएल देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे खंडपीठाने रिझर्व्ह बँक आणि डीआयपीपीला सांगितले. एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाचे न्यायाधीश वीरेंद्रसिंग बिश्त आणि प्रभात कुमार यांनी हे निर्देश दिले आहेत. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (आयआयएचएल) आणि कर्जदार समिती यांनी संयुक्त बैठक घेऊन दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत, असेही खंडपीठाचे आदेश आहेत.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

हेही वाचा >>>India Retail Inflation : भारतात जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरला, पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर!

दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खंडपीठाने २३ जुलैला मुदतवाढ दिली होती. या आदेशाला हिंदुजांनी आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. नियामकांकडून आवश्यक ती मंजुरी मिळत नसल्याने या प्रक्रियेला विलंब होत असल्याचा आयआयएचएलचा याचिकेतील दावा ग्राह्य धरून, खंडपीठाने हे निर्देश दिले.